'ज्युस प्यायला चल...', गोड बोलून पत्नीला घराबाहेर नेलं, निर्जन रस्त्यावर भयानक कृत्य केलं, पती बनला हैवान!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ज्युस प्यायच्या बहाण्याने पती पत्नीला घेऊन घराबाहेर पडला, पण निर्जन स्थळी जाताच त्याने पत्नीसोबत भयानक कृत्य केलं आहे.
कोटा : पतीने दिवसाढवळ्या पत्नीसोबत क्रुरतेचा कळस गाठल्याचा प्रकार घडला आहे. महावीर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रंगबारीच्या हरिओम नगर भागात घरगुती वादातून पतीने पत्नीचा कान कापला आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने तिला एका निर्जन रस्त्यावर नेलं आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला, यात पत्नीचा एक कान कापला गेला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला पहिले मेडिकल कॉलेज आणि नंतर एमबीएस रुग्णालयात पाठवण्यात आले, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉक्टरला दाखवण्याचा बहाणा
हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचं नाव गिरिजेश आहे. मागच्या दोन महिन्यांपासून मी आजारी आहे, मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्जनंतर मी कोटा ग्रामीणमधील देवली माझी गावात आई-वडिलांसबोत राहत होते. पती खुशराजने डॉक्टरला भेटण्याच्या बहाण्याने मला कोटामध्ये बोलावलं. यानंतर माझे वडील मला पतीच्या घरी सोडून परत आले, असं जखमी महिलेने सांगितलं.
advertisement
मारहाण करून चाकूने कान कापला
महिलेने पुढे सांगितले की, मंगळवारी तिचा पती कामावरून परतला आणि तिला ज्युस देण्याच्या बहाण्याने घराबाहेर घेऊन गेला. तो तिला खादी गणेश जी परिसरातील एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेला, जिथे त्याने अचानक तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला काटेरी झुडुपात ढकलले आणि चाकूने तिच्या कानाचा एक भाग कापला.
advertisement
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर, महिलेने महावीर नगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपी पतीची चौकशी करत आहेत.
view commentsLocation :
Kota,Rajasthan
First Published :
November 19, 2025 5:26 PM IST
मराठी बातम्या/देश/
'ज्युस प्यायला चल...', गोड बोलून पत्नीला घराबाहेर नेलं, निर्जन रस्त्यावर भयानक कृत्य केलं, पती बनला हैवान!


