New Dating Trend : कॉफी डेट विसरा, आता वाढलाय 'या' डेटचा ट्रेंड! प्रपोजल प्लॅन करत असाल तर नक्की वाचा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Benefits of concert dating : डेटिंगच्या संकल्पनेत गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाला आहे. एकेकाळी शांत आणि औपचारिक असलेल्या कॉफी डेट्सची जागा आता उत्साही आणि अविस्मरणीय अशा कॉन्सर्ट डेट्सने घेतली आहे. आजकालची तरुण जोडपी एखाद्या शांत कॅफेमध्ये बसून बोलण्याऐवजी, मोठ्या कॉन्सर्टमध्ये किंवा लाइव्ह म्युझिक शोमध्ये एकत्र वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहेत. पण, या ट्रेंडमागे कोणती कारणे आहेत? चला पाहूया..
advertisement
कॉन्सर्टमध्ये दोघांनाही बोलण्याची गरज नसते. संगीत स्वतःच त्यांच्या भावना व्यक्त करते. जेव्हा दोन लोक एकाच लयीत नाचतात किंवा गाण्यावर एकत्र डोलायला लागतात. तेव्हा त्यांच्यात एक नैसर्गिक आणि भावनिक जवळीक निर्माण होते. कॉफी डेटवर जिथे विचारपूर्वक बोलवे लागते, तिथे कॉन्सर्टमध्ये असलेल्या क्षणाचा आनंद घेता येतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
यामागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत. लाइव्ह म्युझिकच्या वेळी शरीरात ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन हे हार्मोन्स रिलीज होतात. आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तुगनेट यांनी म्हंटल आहे की, "या हार्मोन्समुळे नैसर्गिक उत्साह निर्माण होतो, जो लोक अनेकदा त्यांच्या साथीदाराशी जोडतात. ही एक जैविक प्रक्रिया आहे. संगीतावर दोघांचे मतैक्य झाल्याने त्वरित आपसातील कनेक्शन वाढते, जे पारंपरिक डेटिंग सेटिंगमध्ये पुन्हा तयार करणे कठीण आहे."
advertisement


