देशात याठिकाणी होऊ शकतो भयानक भूकंप, IIT च्या प्राध्यापकानं दिला इशारा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भूकंपाचा केंद्रबिंदू इतर ठिकाणी असतो. इथे फक्त त्याचा प्रभाव किंवा धक्का जाणवतो.
अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी
कानपूर, 6 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के पाहायला मिळाले होते. उत्तर भारतातही आजकाल अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपाचे केंद्र नेपाळचे बझांग होते. यामध्ये पहिल्या भूकंपाची तीव्रता 5.3 तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांचे म्हणणे आहे की, या प्रकारचे आणखी भूकंप तसेच जास्त तीव्रतेचा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे.
advertisement
आयआयटी कानपूर पृथ्वी विज्ञान विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक जावेद मलिक यांनी सांगितले की, भूकंप हे नैसर्गिक संकट आहे. पण उत्तर प्रदेशात कधीच भूकंप होत नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू इतर ठिकाणी असतो. इथे फक्त त्याचा प्रभाव किंवा धक्का जाणवतो. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील 61 जिल्हे उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहेत. याठिकाणी भूकंप होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
उत्तर प्रदेशातील भूकंपाचा इतिहास -
प्राध्यापक मलिक यांनी सांगितले की, यावेळी 6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या प्रकारचे भूकंप आगामी काळात काही वर्षांत होत राहतील. मात्र, या भूकंपांची तीव्रता 8 किंवा त्याहून अधिक असण्याची दाट शक्यता आहे. या तीव्रतेचे भूकंप याआधीही अनेकवेळा झाले आहेत आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 1934 मध्ये 8.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
advertisement
यानंतर 2015 मध्ये भूकंप आला नव्हता. त्यावेळी 1505 मध्ये 8.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. ते पुढे म्हणाले की, भविष्यात अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सर्व तयारी करायला हवी. तसेच सरकारनेही सर्व व्यवस्था करावी. हा भूकंप कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, भूकंप होईल, असे ते म्हणाले.
advertisement
उत्तर प्रदेशातील 61 जिल्हे उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहेत. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्याची 4 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये झोन 2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 यांचा समावेश आहे. सर्वात कमी धोकादायक झोन 2 आहे, तर सर्वात धोकादायक झोन 5 आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
October 06, 2023 10:40 PM IST