advertisement

इराण युद्धात भारताचे काय चाललंय? दिल्लीत वेगवान घडामोडी, सुरू केली सर्वात मोठी लष्करी तयारी

Last Updated:

India Defence Deal: भारताने 5,083 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या संरक्षण करारांद्वारे सागरी आणि हवाई सुरक्षेला नवी धार दिली आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी आणि रशियन ‘श्टिल’ क्षेपणास्त्र सौद्यामुळे नौदल व तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली: अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. ही अडपेट तेहरान किंवा वॉशिंग्टनमधून नसून नवी दिल्लीतून आली आहे. भारताने आपली लष्करी ताकद अधिक आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. 3 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. एकूण 5,083 कोटी रुपयांच्या या करारांचा थेट परिणाम भारताच्या सागरी सीमा आणि हवाई सुरक्षेवर होणार आहे. जागतिक पातळीवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि सागरी सुरक्षेचे आव्हान तीव्र होत असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या मेगा कराराचा पहिला भाग Hindustan Aeronautics Limited (HAL) सोबत करण्यात आला आहे. या करारानुसार 2,901 कोटी रुपयांच्या खर्चातून 6 अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ध्रुव) ALH Mk-III भारतीय तटरक्षक दलासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.
ही हेलिकॉप्टर समुद्री गस्त, मच्छीमारांची सुरक्षा, शोध व बचाव मोहिमा तसेच सागरी पर्यावरणाच्या देखरेखीत महत्त्वाची भूमिका बजावतील. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही हेलिकॉप्टर भारतीय किनारपट्टीवर अधिक प्रभावी नजर ठेवण्यास सक्षम ठरतील.
advertisement
या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मिळणारी चालना. या करारामुळे 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) फायदा होणार असून सुमारे 65 लाख मानव-तासांचे रोजगारनिर्माण होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे.
advertisement
रशियन ‘वर्टिकल लॉन्च श्टिल’ क्षेपणास्त्रांनी सज्ज होणार युद्धनौका
दुसरा करार भारतीय नौदलाच्या हवाई संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी करण्यात आला आहे. 2,182 कोटी रुपयांच्या या कराराअंतर्गत रशियाची कंपनी Rosoboronexport सोबत ‘वर्टिकल लॉन्च श्टिल’ क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा करार करण्यात आला आहे.
ही क्षेपणास्त्रे भारतीय युद्धनौकांवर तैनात केली जाणार असून ती शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे अतिशय कमी वेळेत अचूकपणे नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. यामुळे भारतीय नौदलाची सागरी हवाई संरक्षण क्षमता लक्षणीयरीत्या मजबूत होणार आहे.
advertisement
या करारामुळे केवळ भारताची संरक्षण क्षमता वाढणार नाही, तर भारत-रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारीलाही नवे बळ मिळणार आहे. वाढत्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताने उचललेले हे पाऊल धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
इराण युद्धात भारताचे काय चाललंय? दिल्लीत वेगवान घडामोडी, सुरू केली सर्वात मोठी लष्करी तयारी
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement