Indian Navy: भारतीय नौदलाच्या हालचालींनी पाकिस्तान धास्तावला, 15 दिवसात 17 रॉकेट डागले, नेमकं काय घडतंय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Indian Navy : पाकिस्तानी लष्कराने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय लष्कराने हे हल्ले परतवून लावले. आता भारताच्या नौदलाच्या हालचालींनी पाकिस्तान धास्तावला आहे.
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी सामर्थ्याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय लष्कराने हे हल्ले परतवून लावले. आता भारताच्या नौदलाच्या हालचालींनी पाकिस्तान धास्तावला आहे. मागील 15 दिवसात भारतीय नौदलाने 17 रॉकेट डागले आहेत.
> भारताच्या समुद्रात काय घडलं?
डीआरडीओने शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी स्वदेशी बनावटीचे अँटी-सबमरीन रॉकेट विकसित केले आहे. गेल्या 15 दिवसांपासून (23 जून-7 जुलै), भारतीय नौदलाने या एक्सटेंडेड रेंज अँटी-सबमरीन रॉकेट (ERASR) ची यशस्वी चाचणी घेतली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि उद्योगांचे अभिनंदन केले आहे. या चाचणीमुळे भारतीय नौदलाची 'स्ट्राइकिंग पॉवर' वाढली असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
advertisement
The User trials of Extended Range Anti-Submarine Rocket (ERASR) have been successfully carried out from INS Kavaratti.
Raksha Mantri Shri @rajnathsingh congratulates DRDO, Indian Navy and the Industry involved in development and trials of the System. He has added that the… pic.twitter.com/T86pgEKNdX
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) July 8, 2025
advertisement
> वेगवेगळ्या रेंजवर 17 रॉकेटची चाचणी
गेल्या 15 दिवसांत, भारतीय नौदलाने डीआरडीओच्या पुणे येथील आर्मामेंट रिसर्च अॅण्ड डेवलपमेंट एस्टेब्लिशमेंट (ARDE) प्रयोगशाळेच्या सहकार्याने आयएनएस कवरत्ती युद्धनौकेपासून वेगवेगळ्या रेंजवर 17 रॉकेटची चाचणी केली. नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने देखील या चाचणीत मदत केली.
> पूर्णपणे स्वदेशी रॉकेट...
विशेष गोष्ट म्हणजे इरेजरची चाचणी स्वदेशी रॉकेट लाँचरद्वारे करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इरेजर हे पूर्णपणे स्वदेशी रॉकेट आहे, जे भारतीय नौदलाच्या युद्धनौकांमधून लढण्यासाठी वापरले जाते. त्यात ट्विन रॉकेट मोटर कॉन्फिगरेशन आहे, ज्यामुळे इरेजर वेगवेगळ्या रेंजवर अचूकतेने डागता येते. या अँटी-सबमरीन रॉकेटमध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज आहे.
advertisement
> लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात...
चाचणी दरम्यान, रेंज व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज फंक्शनिंग आणि वॉरहेडची देखील चाचणी घेण्यात आली. यशस्वी युजर-ट्रायलसह, इरेजर रॉकेट लवकरच भारतीय नौदलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि खाजगी कंपनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (नागपूर) हे दोन्ही सरकारी उपक्रम संयुक्तपणे इरेजर रॉकेटची निर्मिती करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 09, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/देश/
Indian Navy: भारतीय नौदलाच्या हालचालींनी पाकिस्तान धास्तावला, 15 दिवसात 17 रॉकेट डागले, नेमकं काय घडतंय?