भारतातल्या 'या' शहरात लवकरच सुरू होणार शहरांतर्गत हेलिकॉप्टर सर्व्हिस; जाणून घ्या तिकिटाची किंमत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
एखाद्या क्विक बिझनेस ट्रिपसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण, आता त्या व्यक्ती प्रवासात बरेच तास घालवण्याऐवजी वाचलेला वेळ काही तरी चांगलं करण्यास वापरू शकतील.
नवी दिल्ली : मुंबई-दिल्ली-बेंगळुरूसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही सर्वांत मोठी समस्या आहे. बेंगळुरूतली वाहतूक कोंडी देशभरात कुप्रसिद्ध आहे. पीक अवर्समध्ये जाम होणाऱ्या ट्रॅफिकमुळे तिथले नागरिक त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. बेंगळुरूमध्ये लवकरच शहरांतर्गत हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे शहराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास सुकर होणार आहे. शिवाय, बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळापासून शहराच्या आग्नेयेला असलेल्या होसूरपर्यंतचा प्रवासही कमी वेळेत पूर्ण करता येईल. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
BLADE इंडिया कंपनीच्या पुढाकाराने ही शहरांतर्गत हेलिकॉप्टर सेवा बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांचं जीवन सुकर करेल. विशेषत: ज्या व्यक्ती आयटी हब असलेल्या होसूरला जातात त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विमानतळावरून शहराच्या दक्षिणेकडच्या त्यांच्या गंतव्य स्थानावर जाण्यासाठी ते सकाळची हेलिकॉप्टर फ्लाइट (आणि होसूरहून विमानतळाकडे जणार्यांसाठी संध्याकाळची फ्लाइट) पकडू शकतील. दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा त्याउलट प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावर तीन तास लागतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता हेलिकॉप्टर प्रवास ही मोठी बाब आहे. या हेलिकॉप्टर सेवेमुळे एकूण 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात हा प्रवास शक्य होईल. रस्त्यानं हाच प्रवास करण्यासाठी कित्येक तास लागतात.
advertisement
एखाद्या क्विक बिझनेस ट्रिपसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण, आता त्या व्यक्ती प्रवासात बरेच तास घालवण्याऐवजी वाचलेला वेळ काही तरी चांगलं करण्यास वापरू शकतील.
सकाळच्या फ्लाइट 8:45 वाजल्यापासून ते 10:30 AM पर्यंत असतील आणि परतीचा प्रवास दुपारी 3:45 ते संध्याकाळी 5 या वेळेत करता येईल. हेलिकॉप्टरने प्रवास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 6000 रुपयांचं तिकीट घ्यावं लागेल.
advertisement
उपलब्ध माहितीनुसार, कर्नाटकची राजधानी असलेलं बेंगळुरू शहर हे बेंगळुरू जिल्हा व बेंगळुरू ग्रामीण जिल्हा अशा दोन जिल्ह्यांचं प्रशासकीय केंद्र आहे. या शहराला भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखलं जाते. येथे अनेक देशी-विदेशी टेक कंपन्यांची कार्यालयं असून, तिथे देशभरातले तंत्रज्ञ काम करतात. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. शहरांतर्गत हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्यानं या समस्येचा सामना करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2023 12:51 PM IST
मराठी बातम्या/देश/
भारतातल्या 'या' शहरात लवकरच सुरू होणार शहरांतर्गत हेलिकॉप्टर सर्व्हिस; जाणून घ्या तिकिटाची किंमत