'नर्व्हस नाइंटीज'चा शिकार होतंय भारताचं रॉकेट! PSLV दुसऱ्यांदा फेल, आकाशात काय घडतंय? ISRO सुद्धा चिंतेत
- Published by:Priya Lad
Last Updated:
ISRO PSLV-C62 : 2026 सालातील भारतातील पहिली अंतराळ मोहीम, इस्रोचं PSLV-C62 चं प्रक्षेपण तिसऱ्या टप्प्यात शेवटच्या क्षणी फेल झालं आहे. याआधी PSLV-C61 सोबतही असंच घडलं होतं. चार टप्प्यांचे हे रॉकेट 90% वेळ काम करतं नंतर फेल होतं.
12 जानेवारी 2026 हा दिवस भारतासाठी महत्त्वाचा दिवस होता. 2026 सालातील भारतातील पहिली अंतराळ मोहीम होती. इस्रोचं PSLV-C62 ने आकाशात झेप घेतली. चार टप्प्यांचं हे रॉकेट. 3 टप्प्यांपर्यंत पोहोचलं पण तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या क्षणी हे रॉकेट फेल झालं. असं दुसऱ्यांदा घडतं आहे. 90 टक्क्यांपर्यंत पोहोचताच मोहीम अयशस्वी होत आहे. भारताच्या रॉकेटला सलग दुसऱ्यांदा नर्व्हस नायंटिजचा सामना करावा लागतो आहे. असं नेमकं का होतं आहे? आकाशात असं काय घडतं आहे? अशी चिंता आता इस्रोलाही लागून राहिली आहे..
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं 2026 मधील पहिलं प्रक्षेपण PSLV-C62. सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केलं, पण तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी त्याला गंभीर समस्या आली. PSLV-C62 मधील समस्या तिसऱ्या टप्प्यात (PS3) आली, जी एक घन इंधन मोटर आहे. रोल रेट डिस्टर्बन्स म्हणजे रॉकेटच्या फिरण्याच्या गतीमध्ये अचानक बदल झाला. रॉकेटचा मार्ग ठरलेल्या मार्गापासून विचलित झाला, ज्यामुळे तो कक्षेत पोहोचण्यासाठी गती प्राप्त करू शकला नाही.
advertisement
परिणाम म्हणजे मुख्य पेलोड, DRDO चा EOS-N1 (अन्वेषा) उपग्रह आणि इतर 15 सह-प्रवासी उपग्रह असे एकूण 16 सॅटेलाईट अपेक्षित कक्षेत पोहोचलं नाही.
दुसऱ्यांदा मोहीम फेल
तिसऱ्या टप्प्यात समस्या येण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी मे 2025 मध्ये PSLV-C61 मोहिमेतही असंच घलं होचंय तिसऱ्या टप्प्यात चेंबर प्रेशर कमी झाल्यामुळे EOS-09 उपग्रह देखील हरवला होता. त्या मोहिमेनंतर, ISRO ने PSLV फ्लीट ग्राउंड केलं, आढावा घेतला आणि सुधारणा केल्या, पण समस्या कायम राहिली. पीएसएलव्ही-सी61 च्या अपयशाची कारणे इस्रोने पूर्णपणे उघड केलेली नाहीत आणि सविस्तर अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. हे सर्व उपग्रह आता अवकाशात हरवले आहेत किंवा वातावरणात जळून खाक झाले आहेत.
advertisement
काय घडतंय? इस्रोही चिंतेत
चार टप्प्यांचे हे रॉकेट 90% वेळ काम करतं नंतर फेल होतं. म्हणजेच नर्व्हस नायंटिजचा सामना करतंय. आता यामागील संभाव्य कारणं म्हणजे सॉलिड मोटरमध्ये दाब कमी होणं, नोझल नियंत्रण समस्या, किंवा नियंत्रण प्रणालीतील बिघाड. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितलं की तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी रॉकेटची कामगिरी सामान्य होती पण त्यानंतर रोल रेट त्रुटी आणि उड्डाण मार्गात बदल दिसून आला. आम्ही डेटाचे तपशीलवार विश्लेषण करत आहोत. ISRO ने आता चौकशीसाठी एक अपयश विश्लेषण समिती स्थापन केली आहे.
advertisement
The PSLV-C62 mission encountered an anomaly during end of the PS3 stage. A detailed analysis has been initiated.
— ISRO (@isro) January 12, 2026
इस्रोने म्हटलं आहे की डेटाचं सविस्तर विश्लेषण केलं जाईल आणि लवकरच एक अहवाल प्रसिद्ध केला जाईल.
याचा परिणाम काय?
डीआरडीओचा अन्वेषा उपग्रह संरक्षणासाठी महत्त्वाचा होता. सीमा पाळत ठेवणं, लपलेल्या लक्ष्यांचा शोध घेणं हा याचा उद्देश होता. त्याच्या नुकसानाचा लष्करी गुप्तचर क्षमतेवर परिणाम होईल. अन्वेशा पाकिस्तान किंवा चीनच्या कारवायांबद्दल माहिती देणार होती. आता हे होण्यास विलंब होईल. PSLV ला ISRO चा वर्कहॉर्स मानलं जातं. त्यांनी 94-95% यश दरासह 60 हून अधिक यशस्वी प्रक्षेपणे केली आहेत.
advertisement
C61 आणि C62 च्या अपयशामुळे इस्रो, डीआरडीओ, एनएसआयएल आणि देशाचं 500-800 कोटी रुपयांचं आर्थिक आणि प्रतिष्ठेचे मोठं नुकसान झालं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Jan 12, 2026 2:21 PM IST
मराठी बातम्या/देश/
'नर्व्हस नाइंटीज'चा शिकार होतंय भारताचं रॉकेट! PSLV दुसऱ्यांदा फेल, आकाशात काय घडतंय? ISRO सुद्धा चिंतेत










