प्रसिद्ध पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल; नोट सापडली पण समोर आलं धक्कादायक कारण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कमला पसंद आणि राजश्री पान मसालाचे मालक कमल किशोर चौरसिया यांच्या सूने दिप्ती चौरसिया यांनी कौटुंबिक वादातून दिल्लीतील घरी आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली.
देशातील प्रसिद्ध पान मसाला कंपनीच्या मालकांच्या सूनेनं आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. लग्नावरुन वाद होते त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा जोर धरु लागली आहे. मसाला कंपनी कमला पसंद आणि राजश्री पान मसालाचे मालक कमल किशोर चौरसिया यांच्या सूनेनं आयुष्य संपवलं.
कमल किशोर यांचे सुपुत्र हरप्रीत चौरसिया यांच्या 40 वर्षीय पत्नीने मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील घरी आपलं आयुष्य संपवलं. ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळला आहे. दिप्ती यांच्या नातेवाईकांनी तिला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांना फिर्याद दिली असून चौरसिया कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मित्र, आप्तेष्ट आणि कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.
advertisement
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार दिप्ती चौरसिया यांचं लग्न हरप्रीत यांच्यासोबत 2010 रोजी झालं होतं. त्यांना आता 14 वर्षांचा मुलगा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरप्रीत यांनी दोन लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. दुसरी पत्नी दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. यावरुन त्यांच्यात कायम कलह होत होते. पहिली पत्नी आणि हरप्रीत यांच्यात लग्नावरुन वाद असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. याबाबत पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.
advertisement
पोलिसांना घरातून एक नोट मिळाली असून त्याबाबत सध्या बोलणं घाईचं होईल त्यामुळे योग्य तो तपास करूनच यावर बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दिप्ती यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून तिला त्यासाठी भाग पाडल्याचा दावा केला आहे.
कमला पसंद गुटख्याचा व्यवसाय कानपूरमध्ये सुरू आहे. त्याचे संस्थापक कमला कांत चौरसिया यांनी ४०-४५ वर्षांपूर्वी कानपूरच्या फील्डखाना परिसरातील एका किओस्कमधून पान मसाला विकण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय १९८०-८५ मध्ये घरगुती पान मसाला वापरून सुरू झाला आणि आता तो केपी ग्रुप आणि कमला कांत कंपनीच्या मालकीचा आहे, ज्याची उलाढाल अब्जावधी रुपयांपेक्षा जास्त आहे.
advertisement
बाजार विश्लेषकांच्या मते, भारतातील पान मसाला व्यवसाय अंदाजे ४६,८८२ कोटी रुपयांचा आहे, कमला पसंद यांचे बाजार भांडवल ३,००० कोटींपेक्षा जास्त आहे. हा व्यवसाय कानपूर, दिल्ली ते कोलकाता आणि मुंबईपर्यंत पसरलेला आहे. केपी ग्रुप ही कमला पसंद पान मसाल्याची मूळ कंपनी आहे आणि कमला कांत कंपनी एलएलपी या ब्रँडचा ट्रेडमार्क आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/देश/
प्रसिद्ध पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल; नोट सापडली पण समोर आलं धक्कादायक कारण


