खासदार कनिमोई यांचे वादग्रस्त वक्तव्य, पेटवला नवा वाद; श्री हनुमानजींची खिल्ली उडवत म्हटले...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Kanimozhi Controversial Statement: तमिळनाडूत द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान करून भक्तांना धक्का दिला आहे. कनिमोईंच्या वक्तव्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
चेन्नई: दक्षिण भारतातील काही नेत्यांमध्ये विशेषतः द्रमुक (DMK) पक्षात सनातन धर्माची खिल्ली उडवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. तामिळनाडूच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे हे प्रयत्न अधिक तीव्र होत आहेत. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांचा मुलगा उदयनिधि स्टालिन याने सनातन धर्माला संपवण्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता त्यांची बहीण आणि खासदार कनिमोई करुणानिधी यांनीदेखील सनातन धर्माची थट्टा करून नवा वाद निर्माण केला आहे.
advertisement
मदुराई येथील एका जाहीर सभेमध्ये कनिमोई यांनी असे विधान केले, ज्यामुळे सनातन धर्म मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी विशेषतः हनुमानजींची खिल्ली उडवत म्हटले, चांगले झाले की तामिळनाडूमध्ये असे नेते नाहीत जे म्हणतात की हनुमान सर्वप्रथम चंद्रावर गेले होते. नाहीतर हे लोक तर असेही म्हणले असते की चंद्रावर आजी गेली होती आणि ती आजही तिथेच आहे.
advertisement
जर तामिळनाडूतील मुलांना विचारले की चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले, तर ते योग्य उत्तर देतील – नील आर्मस्ट्राँग. पण उत्तर भारतातील काही नेत्यांना विचारल्यास ते म्हणतील, हनुमानजी सर्वप्रथम चंद्रावर गेले होते. या विधानांच्या पुढे जाऊन त्यांनी आजीच्या गोष्टींचे उदाहरण देत सनातन धार्मिक मान्यतांची खिल्ली उडवली. द्रविड राजकारणाशी संबंधित नेत्यांनी सनातन धर्माच्या प्रतीकांवर अशाप्रकारची वादग्रस्त टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कनिमोई यांचे हे विधान त्याच मालिकेतील पुढील भाग मानले जात आहे.
advertisement
द्रविड राजकारण आणि सनातन विरोध
द्रमुक (DMK) आणि त्यांच्याशी संबंधित नेत्यांचे राजकारण दीर्घकाळापासून द्रविड चळवळीच्या नावाखाली सनातन धर्माला लक्ष्य करत आहे. कधी रामायणातील पात्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तर कधी देवी-देवतांची थट्टा केली जाते. यावेळी हनुमानजींविषयी वादग्रस्त टिप्पणी समोर आली आहे. कनिमोई यांनी दावा केला की- तमिळ संस्कृती आक्रमकांनीही नष्ट केली नाही आणि द्रविड चळवळ ही तमिळ लोकांच्या हक्कांसाठीचा आवाज आहे. परंतु याच भाषणात त्यांनी सनातन धार्मिक भावनांचा अपमान केला. तामिळनाडूच्या राजकारणाचे जाणकार सांगतात की ही व्होट बँकेचे राजकारण आहे. ज्यात लोकांच्या श्रद्धा आणि भावनांशी संबंधित प्रतीकांना वारंवार लक्ष्य केले जाते.
advertisement
जनतेचा संताप आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
कनिमोई यांचे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठा रोष दिसून आला. एक्स , फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्म्सवर हजारो वापरकर्त्यांनी याला 'सनातन विरोधी मानसिकता' म्हटले. अनेक युझर्सनी लिहिले की, जर इतर कोणत्याही धर्माबद्दल अशी टिप्पणी केली असती, तर आतापर्यंत माफी मागावी लागली असती. पण जेव्हा सनातन धर्माबद्दल बोलले जाते. तेव्हा याला एक गंमत किंवा विनोद समजले जाते. जनतेच्या या संतापामधून हे स्पष्ट होते की धार्मिक भावनांशी खेळणे आता सहन केले जाणार नाही.
advertisement
विरोधी पक्षांकडून तीव्र टीका
कनिमोईंच्या या विधानावर भाजप (BJP) सह विरोधी पक्षांनी जोरदार पलटवार केला. नेत्यांनी म्हटले की द्रमुकचा खरा अजेंडा 'सनातन विरोध' आहे आणि हिंदूंच्या भावना दुखावणे ही त्यांची सवय झाली आहे. भाजप नेत्यांनी हा प्रश्न देखील उपस्थित केला की, निवडणुका जवळ आल्यावर द्रमुकचे नेते जाणीवपूर्वक अशी वादग्रस्त विधाने का करतात? लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून दुसरीकडे वळवण्याची ही रणनीती आहे का?
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 7:12 PM IST
मराठी बातम्या/देश/
खासदार कनिमोई यांचे वादग्रस्त वक्तव्य, पेटवला नवा वाद; श्री हनुमानजींची खिल्ली उडवत म्हटले...