कुणी पत्रकार तर कुणी खासदार; प्रियंका गांधींच्या टीममधील हे 7 शक्तिशाली अन् खास चेहरे कोण?

Last Updated:

priyanka gandhi team wayanad - कांग्रेसचे सर्व मोठे नेते याठिकाणी सक्रिय आहेत. आज आपण प्रियंका गांधी यांच्या टीम वायनाडमध्ये कोण-कोण आहे, हे जाणून घेऊयात. यामध्ये आमदार आणि खासदार यांचा समावेश आहे.

प्रियंका गांधी (फाईल फोटो)
प्रियंका गांधी (फाईल फोटो)
तिरुवनंतपुरम : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्या आहेत. त्यांचे भाऊ आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड येथून खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. यानिमित्ताने कांग्रेसचे सर्व मोठे नेते याठिकाणी सक्रिय आहेत. आज आपण प्रियंका गांधी यांच्या टीम वायनाडमध्ये कोण-कोण आहे, हे जाणून घेऊयात. यामध्ये आमदार आणि खासदार यांचा समावेश आहे.
प्रियंका गांधी यांच्या वायनाड टीममध्ये आमदार आणि खासदार यांचा समावेश आहे. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे - 
ए. पी. अनिल कुमार : या टीमचे हे वरिष्ठ सदस्य आहेत. तसेच केरळचे माजी मंत्री आणि वंदून विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2001 पासून ते या पदावर आहेत. ते पक्षाचे समन्वयक म्हणून कार्य करत आहेत. अनिल कुमार हे ओमन चांडी यांच्या कॅबिनेटमध्ये 2004 मध्ये सांस्कृतिक कार्य, अनुसूचित जाती आणि युवक व्यवहार मंत्री होते.
advertisement
टी. सिद्दीकी : 50 वर्षांचे टी. सिद्दीकी हे 2024 पासून कालपेट्टा विधानसभेचे आमदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी वायनाड लोकसभा जागेसाठी निवडणूक प्रचार सुरू केला होता. मात्र, राहुल गांधी यांनी याठिकाणाहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी आपली उमेदवारी परत घेतली होती. दोन वर्षांनी केरळ विधानसभा निवडणुकीत त्यांनी कालपेट्टा येथून एलजेडीच्या एम. वी. श्रेयम्स कुमार यांना पराभूत केले होते.
advertisement
आय. सी. बालाकृष्णन : आय. सी. बालाकृष्णन हे 2016 पासून सुल्तान बाथेरी येथील आमदार आहेत. ते 49 वर्षांचे असून आदिवासी समाजाचे नेते आहेत. त्यांनी केएसयू नेता म्हणून आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
जेबी मॅथर : जेबी मॅथर या राज्यसभेचा खासदार आहेत. त्या 46 वर्षांच्या असून पहिल्या महिला राज्यसभा खासदार आहेत. त्या एर्नाकुलममध्ये कांग्रेस कुटुंबातून येतात आणि केरळ प्रदेश महिला कांग्रेसच्या अध्यक्षासुद्धा आहेत.
advertisement
शमासद मरक्कार : स्थानिक कांग्रेस नेते शमासद मरक्कार हे वायनाड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. ते राज्यातील एकमेव पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. 2020 मध्ये वयाच्या 33 व्या हे पद मिळवणारे ते राज्यातील सर्वात तरुण व्यक्ती होते.
राजू पी नायर : राजू पी नायर हे केपीसीसी डिजिटल मीडिया सेलचे समन्वयक, वायनाडमध्ये यूडीएफचे मीडिया समन्वयकही आहेत. 48 वर्षीय नायर हे एर्नाकुलममध्ये मुलंथुरुथी पंचायत समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा कांग्रेस समितीचे महासचिव आहेत.
advertisement
ज्योती विजयकुमार : 44 वर्षांच्या ज्योती विजयकुमार या प्रियंका गांधींच्या मल्याळम अनुवादक आहेत. त्या एक वकील, माजी पत्रकार आणि टीव्ही अँकर आहेत. राहुल गांधींच्या सार्वजनिक भाषणांच्या अनुवादामुळे त्यांना ओळख मिळाली. त्या अलप्पुझा डीसीसीचे माजी महासचिव अॅडव्होकेट डी. विजयकुमार यांच्या कन्या आहेत.
मराठी बातम्या/देश/
कुणी पत्रकार तर कुणी खासदार; प्रियंका गांधींच्या टीममधील हे 7 शक्तिशाली अन् खास चेहरे कोण?
Next Article
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement