जनावरांच्या गोठ्यातून येत होता आवाज; डोकावून पाहताच हादरली महिला, परिसरात थेट लॉकडाऊन

Last Updated:

रात्री उशिरा एका घराच्या मालकिणीला शेडमधून आवाज आल्यावर ती अंगणात डोकावायला गेली. जनावरं खूप आवाज करत होती.

लोकांना सुरक्षिततेसाठी घरातच राहण्यास सांगितलं
लोकांना सुरक्षिततेसाठी घरातच राहण्यास सांगितलं
जयपूर : 2020 साली भारतातील जनतेला पहिल्यांदा लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अचानक पसरलेल्या कोरोनामुळे लोक घरात कैद झाले होते. आपण घराबाहेर पडलो की आपल्या जीवाला धोका आहे अशी भीती लोकांना वाटत होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. व्हायरसचा प्रभाव कमी झाला आहे आणि बाजार पूर्वीप्रमाणेच उघडले आहेत. मात्र, पुन्हा राजस्थानमधील एका भागातील लोकांना पुन्हा एकदा काही काळ घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की हे लॉकडाऊनदेखील कोरोनामुळे लागू करण्यात आलं आहे, तर तसं नाही. यावेळी एक बिबट्या यासाठी कारणीभूत ठरला आहे. धौलपूरच्या मंगरोळ शहरातील लोकांना घरातच राहण्यास सांगितलं गेलं आहे. परिसरात बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्याने आतापर्यंत दोन जणांवर हल्ला केला आहे. मात्र वनविभागाला त्याला पकडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे आता लोकांना सुरक्षिततेसाठी घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे.
advertisement
काही काळापूर्वी उदयपूरमध्ये बिबट्या दिसला होता. आता धौलपूरमध्ये बिबट्याने दोघांवर हल्ला केला आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शहरात रात्री उशिरा एका घराच्या मालकिणीला शेडमधून आवाज आल्यावर ती अंगणात डोकावायला गेली. जनावरं खूप आवाज करत होती. तिने आत जाऊन पाहिलं असता महिलेला बिबट्या दिसला, हे पाहून ती हादरली. जीव वाचवण्यासाठी महिलेनं तात्काळ तिथून पळ काढला.
advertisement
महिलेनं आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. रात्रीच्या अंधारात बिबट्याची शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र तो कोणालाच दिसला नाही. सकाळी देखील टीम त्याचा शोध घेताना दिसली. सध्या टीमने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. जोपर्यंत बिबट्या सापडत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका, अशी विनंती करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
जनावरांच्या गोठ्यातून येत होता आवाज; डोकावून पाहताच हादरली महिला, परिसरात थेट लॉकडाऊन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement