वर्ल्ड कप विजेत्या दोन शिलेदारांना TMCने दिलं लोकसभेचं तिकिट; अभिनेत्री नुसरत जहाँला डावललं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
तृणमूल काँग्रेसच्या या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला तिकिट देण्यात आलं आहे. बहरामपूर मतदारसंघातून तृणमूलने युसुफ पठाणला उमेदवारी दिलीय.
कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत ४२ उमेदवारांची नावे आहेत. तृणमूल काँग्रेसच्या या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला तिकिट देण्यात आलं आहे. बहरामपूर मतदारसंघातून तृणमूलने युसुफ पठाणला उमेदवारी दिलीय. त्याच्याविरोधात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली परिसरात घडलेल्या घटनेमुळे बरीच उलट सुलट चर्चा होत आहे. संदेशखाली बशीरहाट लोकसभा मतदारसंघात येते. याठिकणी सध्या तृणमूलची खासदार अभिनेत्री नुसरत जहाँ आहे. पण तृणमूलने तिला डच्चू देत हाजी नुरुल इस्लाम यांना उमेदवारी दिलीय. युसूफ पठाणशिवाय तृणमूल काँग्रेसने भारताचे आणखी एक क्रिकेटर किर्ती आझाद यांनाही उमेदवारी दिलीय. त्यांना वर्धमान दुर्गापूर मतदारसंघातून तिकिट दिलं जाणार आहे.
advertisement
युसुफ पठाण २००७ मध्ये टी२० वर्ल्ड कप आणि २०११ चा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकलेल्या संघाचा खेळाडू आहे. तर कीर्ति आझाद हे १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात होते. युसूफ पठाण आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून सात वर्षे खेळला आहे. २०१७ आणि २०१४ मध्ये आय़पीएल जिंकणाऱ्या केकेआरच्या संघात तो होता. आय़पीएल जिंकल्यानंतर अनेकदा युसूफ पठाण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटला होता.
advertisement
किर्ती आझाद यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढली होती. ते बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून खासदार झाले होते. पण २३ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांना भाजपने निलंबित केलं होतं. २०१९ मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकिटावर धनबाद मतदारसंघात २०१९ ची लोकसभा लढले पण भाजपच्या पशुपति नाथ यांनी ४.८ लाख मतांनी त्यांना हरवलं होतं. नोव्हेंबर २०२१ मध्ये कीर्ति आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 10, 2024 3:59 PM IST
मराठी बातम्या/देश/
वर्ल्ड कप विजेत्या दोन शिलेदारांना TMCने दिलं लोकसभेचं तिकिट; अभिनेत्री नुसरत जहाँला डावललं