advertisement

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राहुल गांधींनी सोडलं वायनाड

Last Updated:

लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन जागांवरून विजय मिळवला होता. आता यातल्या दोन जागांपैकी राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडली आहे.

प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राहुल गांधींनी सोडलं वायनाड
प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राहुल गांधींनी सोडलं वायनाड
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन जागांवरून विजय मिळवला होता. आता यातल्या दोन जागांपैकी राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडली आहे. वायनाडवरून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत दोन जागांवरून विजय मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना एका जागेवरून राजीनामा द्यावा लागणार होता. नेमका कोणत्या जागेवरून राजीनामा द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देतील, हा निर्णय घेण्यात आला. तसंच राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाडमधून प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार आहेत.
वायनाडच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांचा विजय झाला तर संसदेमध्ये गांधी कुटुंबातले तीनही सदस्य बघायला मिळतील. सोनिया गांधी या काहीच दिवसांपूर्वी राजस्थानमधून राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी लोकसभेत काँग्रेससाठी किल्ला लढवतील.
view comments
मराठी बातम्या/देश/
Priyanka Gandhi : प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, राहुल गांधींनी सोडलं वायनाड
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement