Loksabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून नवा ट्विस्ट? NDA च्या किंगमेकरमध्येच मतभेद!

Last Updated:

केंद्रामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे, पण अजूनही लोकसभा अध्यक्षाची निवड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत सिद्ध करायचं आहे, त्याआधीच मोदी सरकारमधले किंगमेकर जेडीयू आणि टीडीपीमध्ये लोकसभा अध्यक्षपदावरून मतभेद असल्याचं समोर येत आहे.

लोकसभा अध्यक्षपदावरून नवा ट्विस्ट? NDA च्या किंगमेकरमध्येच मतभेद!
लोकसभा अध्यक्षपदावरून नवा ट्विस्ट? NDA च्या किंगमेकरमध्येच मतभेद!
नवी दिल्ली : केंद्रामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे, पण अजूनही लोकसभा अध्यक्षाची निवड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत सिद्ध करायचं आहे, त्याआधीच मोदी सरकारमधले किंगमेकर जेडीयू आणि टीडीपीमध्ये लोकसभा अध्यक्षपदावरून मतभेद असल्याचं समोर येत आहे. भाजपला स्वत:कडे लोकसभा अध्यक्षपद ठेवायचं आहे, याला जेडीयूने होकार दिला आहे, पण टीडीपीने मात्र याबाबत एनडीएच्या घटकपक्षांमध्ये चर्चा व्हावी आणि सर्व सहमतीने लोकसभा अध्यक्षाची निवड व्हावी, अशी मागणी केली आहे.
दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं गेलं नाही तर इंडिया आघाडीही त्यांचा उमेदवार उतरवू शकते. लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार 26 जूनला लोकसभा अध्यक्षाची निवड होईल. यासाठी उमेदवार एक दिवसआधीपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.
भाजपला लोकसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवायचं आहे, यासाठी निवडून आलेल्या खासदारापैकी एका खासदाराची निवड होईल. एनडीएचे घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण भाजपच्या वरिष्ठ नेत्याने आयएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं आहे. लोकसभा अध्यक्षपदाबाबत पहिले पक्षात विचार केला जाईल, त्यानंतर सहकारी पक्षांसोबत चर्चा करून नाव निश्चित केलं जाईल, असं भाजपच्या नेत्याने सांगितलं.
advertisement
जेडीयू भाजपच्या बाजूने
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीने लोकसभा अध्यक्ष एनडीएच्या घटकपक्षांच्या संमतीने बनावा, अशी मागणी केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या निर्णयाचं समर्थन करू, अशी भूमिका घेतली आहे. जेडीयू आणि टीडीपी एनडीएचा भाग आहे, त्यामुळे आम्ही लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवाराचं समर्थन करू, असं जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे. अध्यक्ष कायमच सत्ताधारी पक्षाचा असतो, कारण त्यांची संख्या जास्त असते, अशी प्रतिक्रिया केसी त्यागी यांनी दिली आहे. दुसरीकडे टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कोम्मारेड्डी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना लोकसभा अध्यक्षाचं नाव एनडीए घटकपक्षांनी संयुक्त पद्धतीने ठरवावं, अशी भूमिका घेतली आहे.
advertisement
एनडीएने लोकसभा अध्यक्षाचं नाव चर्चेला बसून ठरवलं पाहिजे. एकदा सहमती झाली की मग आम्ही उमेदवाराला मैदानात उतरवू आणि टीडीपीसह सर्व सहयोगी या उमेदवाराला पाठिंबा देतील, असंही रेड्डींनी स्पष्ट केलं. 24 जूनपासून सुरू होणाऱ्या 18 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात लोकसभा अध्यक्षाची निवड सर्वसंमतीने व्हावी, यासाठी भाजप विरोधी पक्षांसोबत संपर्क करेल. विरोधी पक्ष भाजपच्या या प्रस्तावावर सहमत झाला तर लोकसभा अध्यक्षाची निवड बिनविरोध होईल. पण विरोधी पक्षाने त्यांचा उमेदवार उतरवला तर नव्या अध्यक्षासाठी 26 जूनला मतदान होऊ शकतं.
advertisement
...तर भाजपचा नवा फॉर्म्युला
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुमित्रा महाजन लोकसभा अध्यक्ष होत्या तर दुसऱ्या कार्यकाळात ओम बिरला या पदावर होते. 2014 आणि 2019 प्रमाणे भाजपला बहुमत नसल्यामुळे यावेळी भाजपला लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएच्या घटकपक्षांसोबत चर्चा करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावरून परत आल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा होईल. जर एनडीए घटकपक्षांकडून या पदाबाबत काही सल्ला आला, तर भाजप नव्या फॉर्म्युलावर विचार करेल.
मराठी बातम्या/देश/
Loksabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून नवा ट्विस्ट? NDA च्या किंगमेकरमध्येच मतभेद!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement