मास्टर बेडरूम किती भारी ना? वास्तूशास्त्रानुसार अजिबात नाही योग्य!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
प्राचीन काळात लोक शौचालय घरापासून दूर बांधायचे. वेदिक काळापासून शौचालय घरात बांधण्यास सुरुवात झाली. मात्र आता तर घराच्या बेडरूममध्येही शौचालय असतं, ज्यामुळे...
रितिका तिवारी, प्रतिनिधी
भोपाळ, 16 ऑगस्ट : आपलं कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी आपल्या डोक्यावर एक भक्कम छप्पर असावं, आपलं स्वतःचं घर असावं, असं जवळपास प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत करत असतो. मात्र आपल्याला माहितीये का, घरात केवळ चार भिंती नाही, तर वास्तूशास्त्रदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. वास्तूशास्त्रानुसार बांधणी केल्यास, वस्तू योग्य जागी ठेवल्यास घरात सुख, शांती, समाधानाचं वातावरण नांदतं आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो, असं वास्तू तज्ज्ञ सांगतात.
advertisement
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ रिचा यांनी घराची रचना नेमकी कशी असावी, याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, घर बांधताना सर्वात आधी दिशा लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या बांधकामाची सुरुवातच दिशा ओळखण्यापासून करावी. कारण प्रत्येक दिशेचं आणि कोपऱ्याचं एक विशिष्ट महत्त्व असतं. विशेषतः शौचालय योग्य दिशेतच बांधावं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, मात्र सध्या मास्टर बेडरूमची क्रेझ असली, तरी अशाप्रकारचं बेडरूम वास्तूशास्त्रानुसार योग्य नसतं, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
रिचा पुढे म्हणाल्या, प्राचीन काळात लोक शौचालय घरापासून दूर बांधायचे. वेदिक काळापासून शौचालय घरात बांधण्यास सुरुवात झाली. मात्र आता तर घराच्या बेडरूममध्येही शौचालय असतं, ज्यामुळे संपूर्ण घरात नकारात्मकता पसरते.
आजकाल लोक टोलेजंग इमारतींच्या फ्लॅटमध्ये राहणं पसंत करतात. अशावेळी फ्लॅटचं बांधकाम आधीच झालेलं असल्याने त्यात वास्तूशास्त्रानुसार बदल करता येत नाहीत. मात्र जर बांधकामात काही दोष असेलच तर, काही उपाय करून ते दूर करता येतात, असा सल्ला रिचा यांनी दिला. असं केल्यास घरात नकारात्मकता येत नाही आणि सकारात्मकता कायम राहते, असं त्या म्हणाल्या. म्हणजेच तुमच्या घरात मास्टर बेडरूम असेल तर त्यापासून घरात नकारात्मकता येऊ नये यासाठी तुम्ही वास्तू तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही उपाय करू शकता.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Bhopal,Madhya Pradesh
First Published :
August 16, 2023 12:43 PM IST