आसाममध्ये 5.9 रिश्टरचा भूकंप! संपूर्ण ईशान्य भारत हादरला; त्रिपुरा-मेघालय-नागालँड थरथरले, लोकांत भीतीचे वातावरण
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Earthquake Shook Assam: आसाममध्ये ५.९ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली. ज्याचे धक्के ईशान्य भारतातील इतर राज्यांमध्येही जाणवले. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
दिसपूर: आसाममध्ये रविवारी दुपारी ५.९ तीव्रतेचा भूकंप झाला. ज्यामुळे मेघालय, नागालँड आणि त्रिपुराच्या काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार हा भूकंप दुपारी ४:४१ वाजता झाला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू आसामच्या उदलगुरी जिल्ह्यात ५ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे अक्षांश २६.७८°N आणि रेखांश ९२.३३°E असे नोंदवले गेले. आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.
advertisement
Prelim M5.9 Earthquake Assam, India Sep-14 11:11 UTC, updates https://t.co/BvAO6ecmEy
— USGS Tweet Earthquake Dispatch (@USGSted) September 14, 2025
केंद्रीय मंत्री आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'X' वर पोस्ट करून म्हटले की, आसाममध्ये मोठा भूकंप झाला आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो. सर्वांनी सतर्क राहावे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/देश/
आसाममध्ये 5.9 रिश्टरचा भूकंप! संपूर्ण ईशान्य भारत हादरला; त्रिपुरा-मेघालय-नागालँड थरथरले, लोकांत भीतीचे वातावरण