PM मोदींच्या 'मन की बात'चा प्रवास; 100 एपिसोडचं पुस्तक राष्ट्रपती मुर्मूंना भेट

Last Updated:

रेडिओवरील १०० एपिसोडच्या माइलस्टोनच्या निमित्ताने पुस्तकात प्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. पुस्तकामध्ये या प्रेरणादायी प्रवासाला स्थान देण्यात आलं आहे.

News18
News18
दिल्ली, 11 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या १०० एपिसोडच्या कार्यक्रमांचे वर्णन असलेलं पुस्तक प्रकाशित करण्यात आले. इग्नाइटिंग कलेक्टिव्ह गुडनेस : मन की बात @१०० या पुस्तकाची एक प्रत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुक्रवारी देण्यात आली. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने संपादित तर वेस्टलँड बूक्सने याचं प्रकाशन केलं आहे. यावेळी ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचे सीईओ अखिलेश मिश्रा यांनी राष्ट्रपती भवनात त्यांच्या टीमच्या सदस्यांसह राष्ट्रपतींची भेट घेतली.
रेडिओवरील १०० एपिसोडच्या माइलस्टोनच्या निमित्ताने पुस्तकात प्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. पुस्तकामध्ये या प्रेरणादायी प्रवासाला स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावना दिली आहे. मन की बातच्या एपिसोडवर आधारीत हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध आहे. फक्त लेखांचा संग्रह किंवा भूतकाळाचे प्रतिबिंब नव्हे तर भारताच्या प्रगतीची कहानी या पुस्तकात आहे.
advertisement
advertisement
इग्नाइटिंग कलेक्टिव्ह गुडनेस : मन की बात @100 यात एक व्यापक विश्लेषण आहे. पहिला खंड पंतप्रधान मोदींनी देश आणि देशवासियांमध्ये दोन्ही बाजूंनी संवाद करण्यासाठी स्वीकारलेल्या वेगळ्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/देश/
PM मोदींच्या 'मन की बात'चा प्रवास; 100 एपिसोडचं पुस्तक राष्ट्रपती मुर्मूंना भेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement