534 किमी प्रवास अवघ्या 2 तासांत, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 320 किमी प्रवास 2 तासांत पूर्ण करेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुजरातमध्ये कामाचा आढावा घेतला. ट्रेन 2030 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
320 किमी प्रवास अवघ्या 2 तासांत पूर्ण होणार, तुमचं काम आता एका दिवसातच होणार, सकाळी निघायचं काम करायचं आणि संध्याकाळी पुन्हा घरी परतायचं. विश्वास बसत नाही पण हे बुलेट ट्रेनमुळे शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी गुजरातमध्ये रेल्वेच्या कामाचा आढावा घेतला. ५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) कॉरिडॉरचं बांधकाम वेगानं सुरू आहे.
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल. रेल्वेमंत्र्यांनी रविवारी भावनगर टर्मिनसवरून ३ नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला - भावनगर-अयोध्या एक्सप्रेस, रीवा-पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-रायपूर एक्सप्रेस. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रवास अंदाजे २ तास ७ मिनिटांत पूर्ण होईल.
मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर एकूण १२ स्टेशन्स असतील: मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती. ही लाइन मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होऊन अहमदाबादच्या साबरमती इथे संपेल. लवकरच बुलेट ट्रेनचं ट्रायल रन सुरू होईल असं सांगितलं जात आहे.
advertisement
बुलेट ट्रेनचं काम 2027 पर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्रात ट्रायल रन आणि बाकी संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी 2029 पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल असं सांगितलं जात आहे. याबाबत निश्चित तारीख समोर आली नाही. मात्र आणखी तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
view commentsLocation :
Gujarat
First Published :
August 04, 2025 1:54 PM IST


