फक्त 12 पर्यंत शिक्षण, संपत्ती इतके कोटी; भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या डोक्यावर आहे कर्ज; पत्नी कंपनीत डायरेक्टर

Last Updated:

Nitin Nabin Net Worth: बिहारच्या राजकारणातून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचलेल्या नितीन नबीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असून त्यांच्या संपत्तीचा तपशील चर्चेत आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: बिहारच्या राजकारणातून राष्ट्रीय पातळीवर झेप घेत नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मंगळवारी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले नितीन नबीन हे पटना येथील बांकीपूर मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली मालमत्ता, उत्पन्न आणि देणी यांचा सविस्तर तपशील दिला होता. त्यानुसार केवळ 12 वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नितीन नबीन यांची एकूण संपत्ती 3 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
3 कोटींची संपत्ती, 56 लाखांची देणी
बिहारच्या राजकारणात नितीन नबीन हे एक मोठे आणि प्रभावी नाव मानले जाते. 2006 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी 2010, 2015, 2020 आणि 2025 या चारही विधानसभा निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवत आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण नेटवर्थ 3 कोटी 6 लाख रुपये इतकी आहे, तर त्यांच्यावर 56 लाख रुपयांची देणी आहेत.
advertisement
या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे नितीन नबीन आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 60 हजार रुपये रोख रक्कम होती, तर पती-पत्नीच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून 98 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पत्नीचा म्युच्युअल फंडमध्ये लाखोंचा गुंतवणूक प्रवास
बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी स्वतः शेअर बाजारापासून काहीसे अंतर ठेवले असले, तरी त्यांच्या पत्नीच्या गुंतवणुकीकडे पाहिले असता वेगळे चित्र दिसते. त्यांच्या पत्नीने मिडकॅप आणि मल्टीकॅप म्युच्युअल फंड्समध्ये 6 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. विमा पॉलिसींबाबत बोलायचे झाल्यास नबीन यांच्याकडे तीन LIC पॉलिसी आणि एक HDFC पॉलिसी आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावरही LIC आणि SBI Life Insuranceच्या पॉलिसी आहेत. याशिवाय प्रतिज्ञापत्रानुसार नबीन यांच्या पत्नी Navira Enterprises या कंपनीच्या संचालक (Director) देखील आहेत.
advertisement
सोनं-चांदी आणि गाड्या
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार नबीन यांच्या नावावर एक स्कॉर्पियो आणि एक इनोव्हा क्रिस्टा अशा दोन कार नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच पती-पत्नी आणि मुलांकडे मिळून जवळपास 11 लाख रुपयांची सोन्या-चांदीची दागिने असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार नितीन नबीन यांच्याकडे एकूण 92.71 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता, तर पत्नी आणि मुलांकडे मिळून सुमारे 68 लाख रुपयांहून अधिक जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.
advertisement
स्थावर मालमत्ता किती?
बीजेपीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर ना कृषी जमीन आहे, ना कोणती व्यावसायिक इमारत किंवा घर असल्याची बाब प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. मात्र, त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये 28 लाख रुपयांची अंदाजे किंमत असलेली कृषी जमीन आणि पटना येथे 1.18 कोटी रुपये किमतीचे घर समाविष्ट आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
फक्त 12 पर्यंत शिक्षण, संपत्ती इतके कोटी; भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या डोक्यावर आहे कर्ज; पत्नी कंपनीत डायरेक्टर
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement