ब्लूटूथ वारंवार का डिस्कनेक्ट होते? 'या' कारणांमुळे तुम्हाला प्रॉब्लम तर येत नाहीये ना
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ब्लूटूथ कनेक्शन वारंवार ड्रॉप होत राहणे हा एक प्रॉब्लमचअसतो. कारण यामुळे डिव्हाइस योग्य प्रकारे काम करु शकत नाही आणि यांना यूज करणे फ्रस्ट्रेटिंग होते.
तुम्हाला डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी लेबल आणि वायरचा झंझट ठेवायचं नसेल तर ब्लूटूथ सर्वात जास्त कामाची गोष्ट आहे. ब्लूटूथच्या माध्यमातून तुम्ही गाणे ऐकण्यापासून डेटा शेअर करणे आणि डिव्हाइस कंट्रोल करण्यापर्यंत अनेक कामं करु शकता. याचा वापर खुप सोपा आहे, मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे हे नीट काम करु शकत नाही. आज आपण जाणून घेऊया की, ब्लूटूथ वारंवार डिस्कनेक्ट का होते आणि यापासून बचावासाठी काय करावे?
advertisement
रेंजकडे लक्ष देणे गरजेचे : तुमचं ब्लूटूथ कनेक्शन वारंवार डिस्कनेक्ट होत असेल तर रेंजचा प्रॉब्लम येऊ शकतो. तुम्ही जुन्या स्पेसिफिकेशन्सचा ब्लूटूथ वापरत असाल तर याची रेंज जवळपास 33 फूट होते. यामुळे बाहेर गेल्यास कनेक्शन ड्रॉप होते. अनेकदा भींतीसारख्या फिजिकल ऑब्जेक्ट मध्येच आल्याने रेंज कमी होते. यामुळे प्रयत्न करा की, तुम्ही होस्ट डिव्हाइसची रेंज बाहेर जाऊ नये.
advertisement
advertisement
advertisement








