सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणाने सरकारला खडबडून जाग, मुख्यमंत्र्यांनी दिला 5 दिवसाचा अल्टीमेटम!

Last Updated:

Noida software engineer death Case : प्रशासकीय स्तरावर झालेली ही मोठी कारवाई मानली जात असून, इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जात आहे.

Noida software engineer death Case Chief Minister
Noida software engineer death Case Chief Minister
Noida software engineer death : नोएडामधील एका मॉलच्या बेसमेंटसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत तात्काळ कारवाईचे संकेत दिले आहेत.

इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत कोण?

या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लोकेश एम यांना पदावरून हटवण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावर झालेली ही मोठी कारवाई मानली जात असून, इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जात आहे. या अॅक्शनमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

विशेष चौकशी पथक

संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सरकारने तीन सदस्यीय विशेष चौकशी पथक म्हणजेच एसआयटी गठीत केलं आहे. या पथकामध्ये मेरठचे विभागीय आयुक्त, मेरठ झोनचे एडीजी आणि पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक घटनेच्या मुळाशी जाऊन जबाबदारी निश्चित करण्याचे काम करणार आहे.

केवळ 5 दिवसांची मुदत

advertisement
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या विशेष चौकशी पथकाला आपला अहवाल सादर करण्यासाठी केवळ 5 दिवसांची मुदत दिली आहे. या पाच दिवसांत नेमका कोणाचा दोष होता आणि मॉलच्या कामात सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? याचा शोध घेतला जाणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
advertisement

मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये

27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. सेक्टर-150 मध्ये एका निर्माणाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंटमध्ये युवराजची विटारा कार कोसळली. रिफ्लेक्टर नसल्याने युवराजला रस्त्यावरील त्या मृत्यूच्या सापळ्याचा अंदाज आला नाही. कार पाण्यात कोसळताच युवराजने आपल्या वडिलांना फोन केला आणि "पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलो, मी बुडतोय... प्लीज मला वाचवा, मला मरायचे नाहीये," अशी आर्त हाक मारली. पण ढिल्ली सिस्टिम अन् मृत्यूच्या दारातून त्याला वाचवता आलं नाही.
view comments
मराठी बातम्या/देश/
सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणाने सरकारला खडबडून जाग, मुख्यमंत्र्यांनी दिला 5 दिवसाचा अल्टीमेटम!
Next Article
advertisement
ZP Election : दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडेट
दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडट
  • जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लागला असला तरी आता निकालाला ब्रेक लागण्याची शक्य

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालावर प्रश्न निर्माण झाले आहे.

  • निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्यास जिल्हा परिषदेचा निकाल रखडण्याची भीती

View All
advertisement