advertisement

बॉयफ्रेंडच्या पत्नीचा 'अपघात' घडवला, मग दिलं HIV इंजेक्शन, सुडाने पछाडलेल्या महिलेचं हादरवणारं कृत्य

Last Updated:

महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या पत्नीलाच संपवण्याचा हादरवून टाकणारा कट रचला. जो मला मिळू शकला नाही, तो दुसऱ्या कुणाचाही होवू नये, या भावनेतून महिलेने क्रुर कृत्य केलं आहे.

बॉयफ्रेंडच्या पत्नीचा 'अपघात' घडवला, मग दिलं HIV इंजेक्शन, सुडाने पछाडलेल्या महिलेचं हादरवणारं कृत्य (AI Image)
बॉयफ्रेंडच्या पत्नीचा 'अपघात' घडवला, मग दिलं HIV इंजेक्शन, सुडाने पछाडलेल्या महिलेचं हादरवणारं कृत्य (AI Image)
मुंबई : प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो असं म्हणतात, पण अनैतिक संबंधांचा शेवट हा अनेकदा क्रुर आणि तितकाच भयानक होतो. एका महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या पत्नीलाच संपवण्याचा हादरवून टाकणारा कट रचला. जो मला मिळू शकला नाही, तो दुसऱ्या कुणाचाही होवू नये, या भावनेतून महिलेने क्रुर कृत्य केलं आहे.
बॉयफ्रेंडच्या पत्नीला संपवण्यासाठी महिलेने आधी रस्ते अपघात घडवून आणला, त्यानंतर जखमी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिला ऑटोरिक्षामध्ये बसवले आणि वाटेत तिच्या गळ्याला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले. महिलेला संशय आल्यानंतर तिने याबाबत पतीला माहिती दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता सत्य समोर आले आणि सर्वांनाच धक्का बसला.
सूड भावनेतून महिलेने तिच्या प्रियकराच्या पत्नीला एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. आंध्र प्रदेशच्या कुरनूल शहरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. कुर्नूल शहरातील रहिवासी डॉ. करुणाकर एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात काम करतात आणि त्यांची पत्नी, डॉ. श्रावणी त्याच वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. महाविद्यालयात काम करणारी नर्स वसुंधरा आणि डॉ करुणाकर यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.
advertisement
करुणाकरने नंतर डॉ. श्रावणीशी लग्न केले. यामुळे वसुंधराच्या मनात राग आणि सूड निर्माण झाला. डॉ. करुणाकरसोबत लग्न होऊ शकलं नाही, त्यामुळे वसुंधराने एक भयानक कट रचला. तिने श्रावणीला करुणाकरपासून वेगळे करण्याचा आणि करुणाकर यांच्या जवळ जाण्याचा विचार केला. यासाठी तिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राजू वेड्स रामभाई या चित्रपटातून प्रेरणा घेतली, ज्यात एक असंतुष्ट वडील आपल्या मुलीला एचआयव्हीचे इंजेक्शन देतात. यातूनच वसुंधराला डॉ श्रावणी यांना एचआयव्ही बाधित इंजेक्शन द्यायची कल्पना सुचली. श्रावणी यांना एचआयव्ही झाला तर तिचा नवरा तिच्यापासून दूर जाईल आणि करुणाकर आपल्याकडे परत येईल, असं वसुंधराला वाटत होतं.
advertisement
डॉ. श्रावणी यांना एचआयव्हीचे इंजेक्शन देण्यासाठी 9 जानेवारीला वसुंधराने तिची मैत्रीण ज्योती आणि तिची मुलं, यशवंत आणि श्रुती यांच्या मदतीने हल्ला केला. डॉ. श्रावणी या दुपारी हॉस्पिटलमधून स्कूटरवरून घरी परत चालल्या होत्या, तेव्हा केसी कॅनालजवळ एका वाहनाने जाणूनबुजून श्रावणी यांच्या स्कूटरला धडक दिली. यानंतर श्रावणी रस्त्यावर कोसळल्या. मदत करण्याचे नाटक करून वसुंधरा आणि तिच्या साथीदारांनी श्रावणी यांना ऑटोरिक्षामध्ये बसण्यास मदत केली. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्यांनी ऑटोरिक्षामध्येच श्रावणी यांच्या घशात इंजेक्शन दिले. यानंतर श्रावणी यांना संशय आला आणि त्यांनी ताबडतोब त्यांचा पती करुणाकर यांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसात तक्रार दाखल केली.
advertisement
डॉ. करुणाकर यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. पोलिसांच्या मते, तेलंगणातील बीचुपल्ली येथील रहिवासी वसुंधरा, डॉ. करुणाकर यांना आधीच ओळखत होती. ती त्यांच्याशी लग्न करू शकत नसल्यामुळे तिच्या मनात सूडबुद्धी होती.
जीजीएच हॉस्पिटलमधील तिच्या संपर्काचा वापर करून, वसुंधराने एचआयव्ही बाधित रक्त मिळवले. 9 जानेवारी 2026 रोजी तिने अपघात घडवून आणला आणि मदत करण्याच्या बहाण्याने श्रावणीला ऑटोमध्ये इंजेक्शन दिले. डीएसपी बाबू प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, वसुंधरा, तिची मैत्रीण ज्योती आणि तिच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पीडितेवर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
बॉयफ्रेंडच्या पत्नीचा 'अपघात' घडवला, मग दिलं HIV इंजेक्शन, सुडाने पछाडलेल्या महिलेचं हादरवणारं कृत्य
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement