PM मोदींना प्रथमच मिळणार ‘शेरनीं’चे सुरक्षा कवच, कशी असले फुलप्रूफ सिक्युरिटी; IPS ते कॉन्स्टेबल...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
PM Narendra Modi Security: गुजरातमध्ये महिला दिनानिमित्त ऐतिहासिक पाऊल, ८ मार्च रोजी PM नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी फक्त महिला पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. IPS ते कॉन्स्टेबलपर्यंत २१००+ महिला पोलिसांचा ‘शक्ती कवच’, देशात पहिल्यांदाच असा प्रयोग होणार आहे.
नवसारी (गुजरात): आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था फक्त महिला पोलिसांकडे असणार आहे. गुजरात सरकारने हा देशातील पहिलाच ऐतिहासिक उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.
महिला पोलिसांचा पहिलावहिला संपूर्ण ताफा
गृहराज्यमंत्री संघवी यांनी सांगितले की, पहिल्यांदाच संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत केवळ महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असतील. नवसारी जिल्ह्यातील वंसी बोरसी गावातील हेलीपॅडवर पंतप्रधान मोदींच्या आगमनापासून ते कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण सुरक्षा व्यवस्था महिला पोलिसांकडे असेल.
या मोहिमेत IPS अधिकारी, पोलिस अधीक्षक, निरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश असेल. 2,100 हून अधिक महिला कॉन्स्टेबल, 187 उपनिरीक्षक, 61 पोलिस निरीक्षक, 16 उपअधीक्षक (DSP), 5 पोलिस अधीक्षक (SP), 1 आयजीपी (IGP) आणि 1 अतिरिक्त DGP दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
advertisement
लखपती दीदी संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 आणि 8 मार्च रोजी गुजरात आणि दादरा आणि नगर हवेली दौऱ्यावर असतील. 8 मार्च रोजी नवसारी जिल्ह्यात ‘लखपती दीदी संमेलन’ या भव्य कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत.
महिला IPS अधिकारी सुरक्षा प्रमुख
view commentsया ऐतिहासिक सुरक्षाव्यवस्थेचे नेतृत्व वरिष्ठ महिला IPS अधिकारी आणि गृहसचिव निपुणा तोरवणे करणार आहेत. गुजरात पोलिसांचा हा उपक्रम संपूर्ण जगाला महिला सशक्तीकरणाचा नवा संदेश देईल आणि गुजरात महिलांसाठी सुरक्षित राज्य आहे, हे अधोरेखित करेल, असे मंत्री संघवी यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2025 5:49 PM IST
मराठी बातम्या/देश/
PM मोदींना प्रथमच मिळणार ‘शेरनीं’चे सुरक्षा कवच, कशी असले फुलप्रूफ सिक्युरिटी; IPS ते कॉन्स्टेबल...


