मोठी बातमी : पाकिस्तान वायूदलाचे F16 विमान भारताने पाडलं, दहशतवादी म्होरक्या हाफीजचा तळ उद्ध्वस्त!

Last Updated:

Pakistan F 16 Aeroplane SHOT DOWN By Indian Army: पाकिस्तानचे तथाकथित अभिमान असलेले एफ-१६ हे लढाऊ विमान नियंत्रण रेषेजवळ भारतीय हवाई दलाने पाडले.

पाकिस्तान F16 विमान
पाकिस्तान F16 विमान
नवी दिल्ली : पहलगाम ते पंपोर परिसरातील एका शाळेच्या छतावर पाकिस्तानी वायूदलाचे F16 लढाऊ विमान भारतीय वायुदलाने अचूक मारा करत पाडले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील ५ अतिरेकी अड्ड्यांवर तर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ४ अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने क्षेपणास्त्र डागत हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईक करत क्षेपणास्त्र डागले आहे. बहावलपूर येथील अतिरेकी शिबीर जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद चालवत होता. याच अतिरेकी शिबिराला भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यभेद केलंय.
पाकिस्तानचे तथाकथित अभिमान असलेले एफ-१६ हे लढाऊ विमान नियंत्रण रेषेजवळ भारतीय हवाई दलाने पाडले. पाकिस्तानचे हे विमान पाडून भारतीय लष्कराने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
advertisement
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात 'ऑपरेशन सिंदूर'चा उद्देश फक्त दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करणे होता, असे म्हटले आहे.

भारताच्या हल्ल्यात १४ दहशतवाद्यांचा खात्मा

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यात १४ अतिरेकी ठार झाले आहेत तर ७० हून अधिक अतिरेकी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनांची शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
advertisement

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूर परिसरात इर्मजन्सी अर्थात आणिबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
मोठी बातमी : पाकिस्तान वायूदलाचे F16 विमान भारताने पाडलं, दहशतवादी म्होरक्या हाफीजचा तळ उद्ध्वस्त!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement