दिल्ली झाली High-Level Meeting, बैठकीनंतर PM मोदींची पोस्ट; सरकारकडून मोठ्या निर्णयाची तयारी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Next-Generation Reforms: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च मंत्री, सचिव आणि अर्थतज्ञांसोबत 'नेक्स्ट-जनरेशन रिफॉर्म्स'साठी रोडमॅपवर चर्चा केली. या सुधारणा 'Ease of Living', 'Ease of Doing Business' आणि देशाच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्वोच्च मंत्री, सचिव आणि अर्थतज्ञांसोबत 'नेक्स्ट-जनरेशन रिफॉर्म्स'साठीच्या (पुढच्या पिढीतील सुधारणा) रोडमॅपवर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी 'X' वर पोस्ट करत सांगितले की, त्यांचे सरकार सर्व क्षेत्रांमध्ये जलद सुधारणांसाठी कटिबद्ध आहे. ज्यामुळे 'Ease of Living' (जीवन सुलभता), 'Ease of Doing Business' (व्यवसाय सुलभता) आणि देशाची समृद्धी वाढेल.
"नेक्स्ट-जनरेशन रिफॉर्म्ससाठी रोडमॅपवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. 'Ease of Living', 'Ease of Doing Business' आणि समृद्धी वाढवण्यासाठी आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यास कटिबद्ध आहोत," असे पंतप्रधान मोदींनी लिहिले.
advertisement
Chaired a meeting to discuss the roadmap for Next-Generation Reforms. We are committed to speedy reforms across all sectors, which will boost Ease of Living, Ease of Doing Business and prosperity. pic.twitter.com/XnJQ5vg3eK
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2025
advertisement
सुधारणांवर सरकारचा भर
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'नेक्स्ट-जनरेशन इकॉनॉमिक रिफॉर्म्ससाठी टास्क फोर्स' (Task Force for Next-Generation Economic Reforms) स्थापन करण्याची घोषणा केली होती. या टास्क फोर्सचा उद्देश आर्थिक क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायदे, नियम आणि प्रक्रियांचा आढावा घेणे आहे. त्यांनी सांगितले की- सरकारने यापूर्वीच 40,000 पेक्षा जास्त अनावश्यक नियमांचे पालन आणि 1,500 जुने कायदे रद्द केले आहेत. तसेच मागील संसदीय अधिवेशनात 280 पेक्षा जास्त तरतुदी हटवण्यात आल्या आहेत.
advertisement
पंतप्रधानांनी भर दिला की सरकार एक आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिक-अनुकूल व्यवस्था (ecosystem) तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. जिथे कायदे आणि प्रक्रिया सोप्या असतील, उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाईल आणि प्रत्येक भारतीय 'विकसित भारत' घडवण्यात योगदान देऊ शकेल.
टास्क फोर्सची उद्दिष्ट्ये
हा टास्क फोर्स निश्चित वेळेनुसार काम करेल, ज्याची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
-स्टार्टअप्स, एमएसएमई (MSMEs) आणि उद्योजकांसाठी नियमांच्या पालनाचा खर्च कमी करणे.
advertisement
-अंमलबजावणीच्या मनमानी कारवाईच्या भीतीपासून मुक्तता देणे.
-व्यवसाय सुलभ करण्यासाठी कायदे सुलभ करणे.
पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले होते की- दिवाळीपर्यंत 'नेक्स्ट-जनरेशन जीएसटी सुधारणा' आणल्या जातील. ज्यामुळे रोजच्या जीवनातील वस्तूंवरील कर कमी होईल. याचा फायदा एमएसएमई, स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना होईल. तसेच यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि एक अधिक कार्यक्षम व नागरिक-अनुकूल अर्थव्यवस्था निर्माण होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 9:48 PM IST
मराठी बातम्या/देश/
दिल्ली झाली High-Level Meeting, बैठकीनंतर PM मोदींची पोस्ट; सरकारकडून मोठ्या निर्णयाची तयारी