लग्नाच्या आधीच सोनमच्या आईने दिली होती वॉर्निंग, अंधश्रद्धेमुळे झाली राजाची हत्या? दिराचा खळबळजनक गौप्यस्फोट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Indore Raja Murder Case : सोनमच्या आईचीही चौकशी करावी, अशी मागणी विपिनने केली आहे. लग्नाच्या आधीच सोनमच्या आईने वॉर्निंग दिली होती, असं सोमनचा दीर विपिन म्हणाला आहे.
Raja Raghuvanshi Murder Case : इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तपासाला नवं वळण मिळालं आहे. राजाचा भाऊ विपिनने दावा केला आहे की, सोनमने लग्नापूर्वीच आपल्या आईला सांगितले होते की, जर हे लग्न झाले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. विपिनच्या म्हणण्यानुसार, सोनमच्या आईला तिच्या प्रेमप्रकरणाची पूर्ण कल्पना होती, परंतु त्यांनी ही गोष्ट राजाच्या कुटुंबापासून आणि खुद्द राजाच्या वडिलांपासूनही लपवून ठेवली. सोनमच्या आईचीही चौकशी करावी, अशी मागणी विपिनने केली आहे. जर राजाच्या वडिलांना राज कुशवाहा सोबतच्या संबंधांबद्दल कळले असते, तर त्यांनी त्याला नोकरीवरून काढले असते, म्हणूनच सोनमच्या आईने सर्व माहिती दडपून ठेवली, असे विपिनने सांगितले.
लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी...
विपिनने पुढं सांगितलं की, लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी सोनम आणि राजा एका दुसऱ्या लग्नासाठी गेले होते. तिथे राजाने आपल्या कुटुंबीयांकडे तक्रार केली की, सोनम त्याच्याशी बोलत नाहीये आणि एका कोपऱ्यात मोबाईलमध्ये व्यस्त आहे. राजाला सोनमचे हे वागणे अजिबात आवडले नसल्याचेही त्याने सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला समजावले की नवीन लग्न आहे, हळूहळू सर्व काही ठीक होईल.
advertisement
राजाच्या हत्या केली तर मंगळ दोष संपेल
दरम्यान, या प्रकरणात विपिनने सर्वात धक्कादायक दावा सोनमच्या मंगळ दोषाबद्दल केला आहे. सोनमचा मंगळ दोष खूप प्रभावी होता आणि तिला वाटत होते की राजाच्या हत्येने तिचा मंगळ दोष संपेल, असे विपिनचे म्हणणे आहे. विपिनच्या दाव्यानुसार, सोनमने आधीच योजना आखली होती की राजाच्या हत्येनंतर ती राज कुशवाहाशी विधवा म्हणून लग्न करेल, जेणेकरून कोणीही तिच्यावर संशय घेऊ नये. पोलिसांनी आता या सर्व दाव्यांची गांभीर्याने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 10, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
लग्नाच्या आधीच सोनमच्या आईने दिली होती वॉर्निंग, अंधश्रद्धेमुळे झाली राजाची हत्या? दिराचा खळबळजनक गौप्यस्फोट!