अरे वा...सोन्याचा चांद्रयान? त्यावर तिरंगा लहान? शिल्पकारांची कमाल

Last Updated:

त्यांनी जगातल्या सर्वात लहान लेन्सने पाहता येईल, अशी चांद्रयान-3ची मिनी प्रतिकृती तयार केली आहे तीदेखील सोन्याची.

विशेष बाब म्हणजे त्यावर अर्ध्या मिलीमीटर आकाराचा तिरंगादेखील लावण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे त्यावर अर्ध्या मिलीमीटर आकाराचा तिरंगादेखील लावण्यात आला आहे.
निशा राठौड, प्रतिनिधी
उदयपूर, 18 सप्टेंबर : चांद्रयान-3ने चंद्रावर पाऊल ठेवताच जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक झालं. कलाकारांनीही आपल्या कलेतून अनोख्या शैलीत शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. ज्यांच्या नावावर तब्बल 100 विश्वविक्रम आहेत असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध शिल्पकार डॉ. इकबाल सक्का यांनी तर चक्क कमालच केली.
त्यांनी जगातल्या सर्वात लहान लेन्सने पाहता येईल, अशी चांद्रयान-3ची मिनी प्रतिकृती तयार केली आहे तीदेखील सोन्याची. या चांद्रयानचा आकार अवघा 2 मिलीमीटर इतका आहे, तर विशेष बाब म्हणजे त्यावर अर्ध्या मिलीमीटरचा तिरंगादेखील लावण्यात आलाय.
advertisement
सक्का यांना या कामगिरीबद्दल प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आलं. होप आंतरराष्ट्रीय रेकॉर्डच्या भारतीय कार्यालयाचे प्रमुख डॉ. अहमद शेख यांनी त्यांना सन्मानित केलं. आता सक्का चांद्रयानची ही मिनी प्रतिकृती इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेट म्हणून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रीतसर परवानगी मागितली आहे.
advertisement
सक्का यांना हे मिनी चांद्रयान बनवण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे हे चांद्रयान एवढं लहान आहे की, त्याचं वजन आहे केवळ 00.0 मिलीग्राम. म्हणजे त्याला काही वजनच नाही. दरम्यान, सक्का यांनी आतापर्यंत सोन्याच्या विविध कलाकृती बनवून विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत. सुवर्ण मिनिएचर शिल्पकार म्हणून जागतिक स्तरावर त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
अरे वा...सोन्याचा चांद्रयान? त्यावर तिरंगा लहान? शिल्पकारांची कमाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement