कॅनडा आणि भारतामध्ये अमेरिका भारताचीच निवड करेल कारण...; पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य, ट्रुडोंनाही सुनावलं

Last Updated:

पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी भारताचं कौतुक करताना कॅनडाला चांगलंच फटकारलं आहे.

News18
News18
वॉशिंग्टन, 23 सप्टेंबर : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या आरोपांमध्ये जर खरोखरच तथ्य असेल तर याचा मोठा धोका हा भारतापेक्षा कॅनडाला असल्याचं अमेरिकेला वाटते असं पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, जर अमेरिकेला कॅनडा आणि भारत यापैकी एकाची निवड करायची असेल तर अमेरिका निश्चितच भारताची निवड करेल. कारण भारत आता जागतिक शक्ति बनत आहे धोरात्मकदृष्या कॅनडापेक्षा भारताचं महत्त्व अधिक आहे. कॅनडाशी भारतासोबतची लढत म्हणजे एका मुंगीनं हत्तीसोबत घेतलेली टक्कर असल्याचं रुबिन यांनी म्हटलं आहे.
मायकेल रुबिन हे पेंटागॉनचे माजी अधिकारी आहेत, ते इराण, तुर्की आणि दक्षिण आशियामध्ये असलेल्या अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी देखील आहेत. ते यावेळी बोलताना म्हणाले की धोरात्मकदृष्या कॅनडाच्या तुलनेत भारत अधिक महत्त्वाचा आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले आहे, यावरून भारत आणि कॅनडाचे संबंध चांगलेच तानले गेले आहेत. यावरून देखील रुबिन यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला आहे.
advertisement
रुबिन यांनी म्हटलं आहे की, निज्जर हा एक दहशतवादी होता. इथे मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. त्याचा अनेक दहशतवादी कारवायामध्ये समावेश होता. असं रुबिन यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
कॅनडा आणि भारतामध्ये अमेरिका भारताचीच निवड करेल कारण...; पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य, ट्रुडोंनाही सुनावलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement