Seema Haider news: सीमा हैदरने सचिनसोबत घरावर फडकावला तिरंगा; गदर 2 विषयी म्हणाली...

Last Updated:

Seema Haider news: पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदरने तिचा प्रियकर सचिन मीनासोबत आज तिच्या घरी तिरंगा फडकावत भारत माता की जयचा नारा दिला.

सीमा हैदरने सचिनसोबत घरावर फडकावला तिरंगा
सीमा हैदरने सचिनसोबत घरावर फडकावला तिरंगा
नोएडा, 13 ऑगस्ट : पाकिस्तानातून आपल्या 4 मुलांसह अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने प्रियकर सचिनसोबत घरी तिरंगा फडकावत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सीमा हैदर आणि सचिन यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे. कराचीमध्ये राहणारी सीमा आता ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथे सचिन मीनासोबत राहत आहे. सीमावर बेकायदेशीरपणे भारतात घुसणे आणि एका अवैध स्थलांतरिताला आश्रय दिल्याप्रकरणी सचिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात टाकले होते. मात्र, नंतर दोघांना जामीन मिळाला. 2019 मध्ये PubG या ऑनलाइन गेमद्वारे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते.
सीमा हैदर म्हणाली की, आज मी माझ्या घरावर तिरंगा फडकवला असून मी फक्त भारताची आहे. यावेळी सीमाने हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि संधी मिळाल्यास गदर 2 चित्रपट पाहायला नक्कीच जाईन असेही सांगितले. यावेळी सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जयच्या घोषणा दिल्या.
मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही : सीमा हैदर
सीमा हैदर म्हणाली की, मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. मी स्वत:चा एक व्हिडिओ बनवला होता, पण त्यात अमित जानी यांनी मला खोटे सांगितले की ते आमचे वकील एपी सिंग यांनी पाठवले होते. रिपोर्ट्सनुसार, मेरठच्या अमित जानीने सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. वास्तविक, अचानक प्रसिद्धी मिळाल्याने सीमा आणि सचिनसह कुटुंबाल कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, दोघांनाही एका कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर येत आहेत.
advertisement
प्रेगन्सींबद्दल सीमा हैदर काय म्हणाली?
याबाबत मी काहीही सांगणार नाही, असे सीमा हैदर म्हणाली. ही माझी वैयक्तिक बाब आहे, मी सांगणार नाही. मला त्याबद्दल बोलायचे नाही, कारण यामुळे नजर लागते. सीमाने सांगितले की, तिला भारतात राहायचे आहे. जर तिला पाकिस्तानात पाठवले तर तिथे मला मारले जाईल, असे तिचे म्हणणे आहे. सीमाला तिच्या मुलांसोबत इथे राहायचे आहे. यासोबतच सीमाला चार मुलांसह हिंदू धर्म स्वीकारायचा आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Seema Haider news: सीमा हैदरने सचिनसोबत घरावर फडकावला तिरंगा; गदर 2 विषयी म्हणाली...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement