Rarest Of The Rare Case: ‘प्रेमावरील विश्वास उडेल…’, प्रियकराला विष देऊन मारणाऱ्या ग्रीष्माला फाशीची शिक्षा, प्रकरण वाचून थरकाप उडेल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Kerala Raj murder case: प्रियकराची विष पाजून हत्या करणाऱ्या २४ वर्षीय ग्रीष्मा या तरुणीला केरळमधील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
तिरुवनंतपूरम: केरळमधील तिरुवनंतपूरम जिल्ह्यातील नेय्याट्टिनकार येथील सत्र न्यायालयाने सोमवारी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली. २४ वर्षीय ग्रीष्माच्या तरुणासोबत नात्यात होती त्याची विष पाजून हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी ग्रीष्मासह तिचे काका निर्मलकुमारन नायर यांना दोषी ठरवले होते. तर आई सिंधुची निर्दोष मुक्तता केली होती. कोर्टाने आज शिक्षा सुनावताना ग्रीष्माला फाशीची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड केला आहे.
काय आहे प्रकरण
तिरुवनंतपुरममधील परसाला येथील शेरोन राज आणि ग्रीष्मा 2021 पासून मित्र होते. शेरोन पदवीच्या अंतिम वर्षात होता तर ग्रीष्मा पदवीचे शिक्षण घेत होती. दोघाचे प्रेम संबंध जुळले.सर्व काही सुरळीत सुरू असताना मार्च 2022 मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबियांनी तिचा विवाह लष्करातील एका अधिकाऱ्याशी निश्चित केला. धक्कादायक म्हणजे शेरोन सोबत नात्यात असताना तिने या लग्नाला होकार दिला होता.
advertisement
स्वत:चे लग्न ठरल्यानंतर ग्रीष्माने शेरोनच्या हत्येचा कट रचला. ग्रीष्माने शेरोनसोबत ब्रेकअप देकील केले नव्हते. तिने पेन किलरचा शरीरावर होणाऱ्या परिणामाबद्दल ऑनलाइन बराच रिसर्च केला आणि शेरोनला विष देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. तिने अनेक वेळा पाण्यात गोळ्या टाकून शेरोन दिल्या तर काही वेळा ज्यूसमधून गोळ्या दिल्या. मात्र या कोणत्याही गोष्टीचा शेरोनवर तिला हवा तो परिणाम झाला नाही. त्यामुळे तिने शेरोनला मारण्यासाठी अन्य गोष्टींचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1 फेब्रुवारीपासून सोने महागणार का? बजेटमध्ये होऊ शकते विशेष घोषणा
लष्करातील अधिकाऱ्यासोबतच्या लग्नाच्या एक महिना आधी म्हणजे 14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने शेरोनला घरी बोलवले आणि एक आयुर्वेदिक ड्रिंक पाजले ज्यात काही गोष्टी तिने टाकल्या होत्या. आयुर्वेदिक ड्रिंक सर्वसाधारणपणे कडू लागते त्यामुळे शेरोनला काही चुकीचे वाटले नाही.
ग्रीष्माच्या घरातून बाहेर पडल्यावर शेरोनला अस्वस्थ वाटू लागले आणि उलटी झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 ऑक्टोबर 2023 रोजी शेरोनचा तिरुवनंपुरम वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी शेरोनने संशय व्यक्त केला की ग्रीष्माने त्याला विष दिले होते. शेरोनच्या एका मित्राने देखील म्हटले होते की, ग्रीष्माने त्याला धोका दिला आहे. शेरोनच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली.
advertisement
प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला, जिंकला खो खो वर्ल्डकप
या प्रकरणी ग्रीष्माला 31 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आली. एका वर्षानंतर सप्टेंबर 2023 मध्ये तिला जामीन मिळाला. या सोबत आई आणि काकाला या गुन्ह्यात तिला साथ दिल्याबद्दल तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत ग्रीष्माने हे मान्य केले होते की, तिला शेरोन सोबतचे नाते संपवाचे होते. तिने शेरोना स्वत:चे अश्लील फोटो नष्ट करण्यास सांगितले होते. तिला भीती होती की शेरोन तिचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला दाखवले. त्यामुळेच शेरोनची हत्या करण्याचा कट रचला.
view commentsLocation :
Thiruvananthapuram,Kerala
First Published :
January 20, 2025 1:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
Rarest Of The Rare Case: ‘प्रेमावरील विश्वास उडेल…’, प्रियकराला विष देऊन मारणाऱ्या ग्रीष्माला फाशीची शिक्षा, प्रकरण वाचून थरकाप उडेल


