456 टायरांचा बाहुबली ट्रक, 24 जणांचा स्टाफ; पाहण्यासाठी हायवेवर मोठी गर्दी
- Published by:Meenal Gangurde
- Translated by:News18 Marathi
Last Updated:
हा सर्वसाधारण ट्रक नाही तर बाहुबली ट्रक असून याला 10 नव्हे तर 456 टायर आहेत.
चूरू, 19 सप्टेंबर : राजस्थानच्या रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून बाहुबली ट्रक पाहायल मिळत आहे. हा ट्रक हायवेवरुन जाणाऱ्या लोकांसाठी आकर्षणाचा केंद्र बनलं आहे. हायवेवर तुम्ही अनेकदा एखादा ट्रक धावताना पाहिलं असेल मात्र हा ट्रक धावत नाही तर रांगत आहे. हा ट्रक पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली आहे. हा सर्वसाधारण ट्रक नाही तर बाहुबली ट्रक असून याला १० नव्हे तर ४५६ टायर आहेत. हो तुम्ही वाचलेलं खरं आहे. अवजड वस्तू घेऊन जाणाऱ्या या ४५६ टायरांच्या ट्रकला दोन ट्रक पुढून खेचल आहेत तर एक ट्रक मागून धक्का देत आहे.
या बाहुबली ट्रकची रस्त्यावर चालताना अक्षरश: दहशत आहे. या ट्रकसाठी अख्खा रस्ता रिकामी करावा लागतो. कारण या ट्रकची लांबी आणि रूंदी इतकी जास्त आहे, की, हा ट्रक चालताना अख्ख्या रस्त्याभर पसरतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसात या ट्रकने २० किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. या ट्रकसह २० ते २५ लोकांचा स्टाफ सोबत चालत आहे.
advertisement
हा ट्रक चालतो तेव्हा काही लोक ट्रकच्या समोर लाल ध्वज फडकवतात. ४५६ टायरांचा हा बाहुबली ट्रक गेल्या ९ महिन्यांपासून रस्त्यावरून चालत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक गुजरातहून निघाला असून पंजाबमधील भटिंया येथे जात आहे. हा ट्रक येथील रिफायनरीत जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४५६ टायरांच्या ट्रकमध्ये ठेवलेल्या पार्ट्समध्ये शेकडो किलो वजन आहे. रिफायनरीत कच्च्या तेलाचा उपयोग करण्यासाठी या पार्ट्सचा उपयोग होणार आहे. हायवेवर रांगणाऱ्या या बाहुबली ट्रकला पाहण्यासाठी लांबून-लांबून लोक येत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2023 3:06 PM IST