TikTokचा भारतभर धडाकेबाज कमबॅक? अचानक वेबसाईट उघडली; फॅन्सची धावपळ,सोशल मीडियावर खळबळ

Last Updated:

TikTok In India: भारतामध्ये 2020 पासून बंदी घालण्यात आलेल्या TikTok ने अचानक वेबसाईट उघडल्याने खळबळ उडाली आहे. अॅप मात्र अजूनही Play Store आणि App Store वर उपलब्ध नाही.

News18
News18
नवी दिल्ली: चिनी शॉर्ट-व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTokवर जून 2020 पासून भारतात बंदी घातली गेली होती. आता TikTok पुन्हा एकदा अचानक चर्चेत आले आहे. ही चर्चा त्याच्या संभाव्य पुनरागमनाबाबत सुरू झाली आहे. काही युजर्सनी अचानक TikTokची वेबसाईट ऍक्सेस होत असल्याचा दावा केला, तर काहींना ती उपलब्ध झाली नाही. अॅप मात्र अजूनही Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. तरीही TikTokचा डोमेन पुन्हा दिसू लागल्याने अनेक चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र ByteDance, जी TikTokची मूळ कंपनी आहे तिने मात्र भारतात पुन्हा सुरूवात होईल का याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी TikTokची वेबसाईट उघडल्याचे सांगितले.तर काहींना ती अजूनही ऍक्सेस करता आली नाही. अनेक सबपेजेस अजूनही कार्यरत नाहीत. त्यामुळे भारतात TikTokने अधिकृतरीत्या पुन्हा सुरूवात केलेली नाही असे दिसून येते.
TikTok भारतात का बंद झाले?
जून 2020 मध्ये भारत सरकारने TikTokसह एकूण 59 चिनी अॅप्सना बंदी घातली होती. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले होते की ही अॅप्स भारताची सार्वभौमत्व, अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानिकारक आहेत.
advertisement
ही बंदी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय व चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर लादण्यात आली होती. या घटनेनंतर गेल्या अनेक दशकांतील भारत-चीन संबंधांमध्ये मोठी घसरण झाली होती.
advertisement
पुढे काय?
TikTok हे एकेकाळी भारतात सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅप्सपैकी एक होते. ज्याचे 200 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते होते. मात्र सध्या तरी TikTokने भारतात पुनरागमनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अॅप अजूनही बंद आहे. पण थोडक्यात झालेल्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा TikTok परत येईल या आशा जागृत झाल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
TikTokचा भारतभर धडाकेबाज कमबॅक? अचानक वेबसाईट उघडली; फॅन्सची धावपळ,सोशल मीडियावर खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement