Mamta Banerjee : बंगालमध्ये 'खेला होबे', ममता राजीनाम्याच्या तयारीत का? या Photo मध्ये दडलंय सत्य
- Published by:Shreyas
Last Updated:
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर पश्चिम बंगालमध्ये आंदोलनं सुरू आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर पश्चिम बंगालमध्ये आंदोलनं सुरू आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेजचे ज्युनिअर डॉक्टर मागच्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. या डॉक्टरांसोबत चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा आमंत्रण दिलं होतं, पण मीटिंगच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरून डॉक्टर अडून राहिले आणि ही बैठक होऊ शकली नाही. ममता बॅनर्जी जवळपास दोन तास कॉन्फरन्स हॉलमध्ये डॉक्टरांची वाट पाहत बसल्या होत्या, पण डॉक्टरांचं प्रतिनिधी मंडळ बैठकीला आलं नाही.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
आम्ही 2 तासांपेक्षा जास्त वेळ थांबलो, मागच्या वेळी आम्ही बैठक लाईव्ह केली, तेव्हा केस सीबीआयकडे नव्हती. आम्ही बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. पारदर्शक प्रक्रिया आणि सटीक दस्तावेजीकरणासाठी आम्ही पूर्ण बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार होतो. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीसह आम्ही रेकॉर्डिंग सार्वजनिक करायलाही तयार होतो. आम्हाला खुल्या मनाने चर्चा करायची होती. प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यामुळे लाईव्ह करणं शक्य नव्हतं. दोन तासानंतरही ते बैठकीला आले नाहीत, आम्ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
advertisement
ममता राजीनामा द्यायला तयार
'27 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेकांना उपचार मिळत नाहीयेत. चर्चा करून सगळ्या अडचणी सुटू शकतात. आम्हालाही न्याय हवा आहे, पण ही केस आता आमच्या हातात नाही. आम्ही इकडे थांबलो आहोत, बंगालच्या नागरिकांची माफी मागते. आम्ही काहीही करू शकत नाही. इएसएमए आहे, पण आम्ही तो लागू करणार नाही, कारण मी आणीबाणीला पाठिंबा देत नाही. मला मुख्यमंत्रिपदाची खूर्ची नको, मी राजीनामा द्यायला तयार आहे. मीदेखील बरीच आंदोलनं केली आहेत, लोकांना न्याय हवा आहे. लोकांच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे', अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
Location :
Kolkata,West Bengal
First Published :
September 12, 2024 8:21 PM IST
मराठी बातम्या/देश/
Mamta Banerjee : बंगालमध्ये 'खेला होबे', ममता राजीनाम्याच्या तयारीत का? या Photo मध्ये दडलंय सत्य