Rahul Gandhi Press Conference: कोण आहे ही मिस्ट्री गर्ल जिला राहुल गांधींसह सगळेच शोधत आहेत? 7 वर्षांहून अधिक जुना फोटो
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राहुल गांधी यांनी हरियाणातील निवडणुकीत ब्राझिलियन मॉडेलच्या फोटोचा वापर करून २२ बनावट मतदान झाल्याचा पुरावा दिला, २५ लाख बनावट मते टाकल्याचा दावा केला.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे. हरियाणा इथे झालेल्या निवडणुकीदरम्यान एकाच महिलेच्या फोटोचा वापर करून 22 मतदान वेगवेगळ्या नावाने करण्यात आले. याचे पुरावेच राहुल गांधी यांनी समोर आणले. वोट चोरी प्रकरणात हा त्यांनी फोडलेला सर्वात मोठा बॉम्ब होता. ही महिला कोण? जी वेगवेगळ्या नावाने फिरत आहे. राहुल गांधी यांनी ही ब्राझिलीयन मॉडेल असल्याचा उल्लेख आपल्या भाषणादरम्यान केला.
ही तरुणी कोण आहे याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फोटो अनेक वेबसाइटने वापला आहे मात्र तिचे नेमकं नाव समजू शकलं नाही. या फोटोला फेसबुक, न्यूज वेबसाइट आणि इतर साइटवरही वापरण्यात आलं आहे. गुगलवर हा फोटो मागच्या पाच वर्षांपासून फिरत आहे. कधी मॉडेल म्हणून कधी फॅशन किंवा तिच्या हेअरस्टाइलसाठी देखील प्रमोशन करण्यासाठी हा फोटो वेगवेगळ्या साइट्सने वापरला आहे.
advertisement
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ज्या महिलेचा उल्लेख केला आहे ती ब्राझिलियन मॉडेल असल्याचे वृत्त आहे. न्यूज 18 मराठीने शोधलं तेव्हा, असं दिसून आलं की, त्या महिलेचे नाव मॅथ्यूस फेरो नाही. मॅथ्यूस फेरो हे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचं नाव आहे. या फोटोवर कोणतीही रॉयल्टी नाही, त्यामुळे कुणीही हा फोटो वापरत आहे, त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. हा फोटो साधारण ८ ते ९ वर्षांपूर्वी काढला असावा असा अंदाज आहे. हा फोटो असंख्य YouTube व्हिडिओंमध्ये आणि उत्पादनांसह ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइटवर वापरला जात आहे.
advertisement
राहुल गांधींनी केलेल्या दाव्यानुसार गूढ मुलीने हरियाणात २२ वेळा मतदान केलं. त्यांनी स्पष्ट केले की काही मतदान केंद्रांवर एकाच महिलेचा फोटो सीमा, सरस्वती आणि विमला अशा वेगवेगळ्या नावांनी दिसला. त्यांनी सांगितले की त्यांच्या टीमला १० वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर एकच फोटो आणि नाव पाहून आश्चर्य वाटले.
राहुल गांधी म्हणाले की जेव्हा त्यांनी या "गूढ मुलीचा" फोटो त्यांच्या टीमला दाखवला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर त्यांना आढळले की तो एका ब्राझिलियन मॉडेलचा स्टॉक फोटो होता. त्यांनी सांगितले की ही एक परदेशी/स्टॉक फोटो होता, खऱ्या स्थानिक मतदाराची नाही. त्यांनी सांगितले की ती प्रत्यक्षात ब्राझिलियन मॉडेल होती आणि तिच्या फोटोचा वापर करून वेगवेगळे बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले होते, ज्याचा वापर हरियाणात बावीस ठिकाणी मतदान करण्यात आले होते.
advertisement
राहुल यांच्या मते, या पद्धतीने हरियाणात २५ लाख लोकांनी बनावट मतदान केले होते. राहुल यांच्या मते, हरियाणामध्ये या पद्धतीने २५ लाख लोकांनी बनावट मते टाकली.ते म्हणाले, "आमच्याकडे ठोस पुरावे आहेत की हरियाणामध्ये २५ लाख मते टाकण्यात आली. याचा अर्थ असा की दर आठ मतांपैकी एक मत बनावट आहे. तरीही, काँग्रेस पक्ष फक्त २५,००० मतांनी निवडणूक हरला."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 2:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
Rahul Gandhi Press Conference: कोण आहे ही मिस्ट्री गर्ल जिला राहुल गांधींसह सगळेच शोधत आहेत? 7 वर्षांहून अधिक जुना फोटो


