चंद्रावर उतरणार माणूस! NASA ने PHOTO शेअर करत दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दोन लुनार ऑर्बिटर कॅमेरे एकत्र करून हा फोटो नासाने शेअर केला आहे.
मुंबई : चंद्रायान 3 मिशन यशस्वी झालं आहे. हे मिशन यशस्वी करणारा भारत चौथा देश ठरला. आता चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी नासाकडून केली जात आहे. यासाठी नासाने महत्त्वाची माहिती गोळा केली असून फोटोद्वारे शेअर केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक लँडिंगनंतर आता अंतराळवीरांनी स्वतःहून तेथे उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
नासाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यानंतर अंतराळवीरांसाठी एक नवीन आशा निर्माण झाली आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे अभूतपूर्व दृश्य यामध्ये दिसत आहे. नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर माणूस कुठे उतरु शकतो त्या पॉईंटचा फोटो शेअर केला आहे.
दोन लुनार ऑर्बिटर कॅमेरे एकत्र करून हे चित्र काढण्यात आले आहे. एक फोटो Lunar Reconnaissance Orbiter Camera (LROC) आणि दुसरा Shadowcam वरून घेतला गेला आहे. LROC 2009 पासून चंद्राच्या पृष्ठभागाचे डिटेल फोटो घेत आहे.
advertisement
चंद्राच्या गडद भागांचे फोटो काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. 2022 मध्ये कोरिया एरोस्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटने लॉन्च केलेला शॅडोकॅम खूपच खास मानला गेला. कारण ते LROC पेक्षा 200 पट जास्त प्रकाश-संवेदनशील आहे. हा कमी लाईट असेल तरी आपलं काम चांगल्या पद्धतीनं करु शकतो.
हा फोटो चंद्राचा सर्वात प्रकाशित भाग आणि गडद भाग एकत्र करून घेण्यात आले आहे. हा फोटो म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा सर्वसमावेश नकाशा असल्याचं म्हटलं जात आहे. तर नासाने असा एक पॉईंट सांगितला आहे जिथे माणूस उतरु शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2023 2:52 PM IST