BEL Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये भरती सुरू; ​अर्ज कसा करावा ?

Last Updated:

BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नवरत्न कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेनी इंजिनियरिंग पदासाठी पद भरले जाणार आहेत. पात्र उमेदवारांना www.bel-india.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.

BEL Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये भरती सुरू; ​अर्ज कसा करावा ?
BEL Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये भरती सुरू; ​अर्ज कसा करावा ?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नवरत्न कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेनी इंजिनियरिंग पदासाठी पद भरले जाणार आहेत. पात्र उमेदवारांना www.bel-india.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. ट्रेनी इंजिनियरिंग- I पदाच्या भरतीसाठी अलीकडेच अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तरूणांनी जाहिरात व्यवस्थित वाचून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज दाखल करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना 24 सप्टेंबर 2025 ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज BEL च्या अधिकृत संकेतस्थळ bel-india.in यावर स्वीकारले जातील.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited Bharti 2025) भरती प्रक्रियेत एकूण 610 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दोन ठिकाणी नोकर भरती होणार आहे. TEBG (Trainee Engineer Bengaluru Complex) येथे 488 जागांसाठी नोकर भरती होणार आहे. तर, TEEM (Trainee Engineer – Engineering/Manufacturing) येथे 122 जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, कॉम्प्यूटर सायन्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेतून 4 वर्षाचा बीई/ बी. टेक/ बीएससी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. शिवाय, मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठाची पदवी आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे.
advertisement
शैक्षणिक पात्रता
  • एकूण शैक्षणिक पात्रता 18 ते 28 वर्षापर्यंतची असणार आहे.
  • खुला प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त वय 28 वर्षांची आहे.
  • इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे वयाची सूट असणार आहे.
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी 5 वर्षे वयाची सूट असणार आहे.
  • PwBD (40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व) असणाऱ्या उमेदवारांना वरील सर्व सूट आणि व्यतिरिक्त 10 वर्षे सूट देखील असणार आहे.
advertisement
या पदांसाठी नियुक्ती बेंगळुरू आणि भारतातील वेगवेगळ्या शाखांमध्ये केली जाणार आहे. उमेदवारांना सुरूवातीच्या 2 वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवाराच्या कामगिरीनुसार त्याचा करार वाढवला जाईल. जर वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदित असतील तर त्यांच्याकडून तुमचा करार आणखी 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. पहिल्या वर्षी 30, 000 रू. पगार, दुसऱ्या वर्षी 35,000 रू. पगार आणि तिसऱ्या वर्षी 40, 000 रू. इतका पगार तुम्हाला मिळणार आहे. निवड प्रक्रियेत लिखित परीक्षेसोबतच वॉक-इन मुलाखतीचाही समावेश आहे. या मुलाखतींचे आयोजन 25 आणि 26 ऑक्टोबर 2025 रोजी बेंगळुरूमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना नोकरी कोड योग्य प्रकारे भरावा.
advertisement
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. उमेदवारांनी https://jobapply.in/BEL2025BNGComplex/ या लिंकवर जाऊन अर्ज करावा. नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम लॉगिन तयार करून अर्ज फॉर्म भरावा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी. लागू असल्यास सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 177 रू. इतका अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. अनुसूचित जाती- जमाती, अपंग आणि इतर आरक्षित उमेदवारांना शुल्कातून सवलत दिली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in ला भेट द्यावी.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
BEL Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये भरती सुरू; ​अर्ज कसा करावा ?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement