Konkan Railway Schedule: प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता 'कोकण रेल्वे'चा वेग वाढणार, 'या' तारखेपासून वेळापत्रकात होणार बदल

Last Updated:

Konkan Railway Schedule : मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवावा लागतो. त्यामुळे वीर ते उडपी या 646 किलोमीटर मार्गावर रेल्वेवर वेगमर्यादा लागू...

Konkan Railway Schedule
Konkan Railway Schedule
Konkan Railway Schedule : मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवावा लागतो. त्यामुळे वीर ते उडपी या 646 किलोमीटर मार्गावर रेल्वेवर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. वेगमर्यादेचा कालावधी 20 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आणि गाड्यांचा वेगही वाढणार आहे.
कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे रेल्वेमार्गात दरड कोसळ्याची भीती असते. त्याचबरोबर दाट धुक्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता असते. बऱ्याचदा रेल्वेमार्ग खोळंबतो. कोकणात रेल्वनेच्या एकेरी वाहतुकीवर जास्त परिणाम होऊ नये म्हणून दरवर्षी वेळापत्रक ठरवले जाते. त्याचा एक विशिष्ठ कालावधी असतो. हा कालावधी 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत असतो. परंतु यावर्षी रेल्वेने पावसाळ्यातील कामे व्यवस्थित पार पाडल्यामुळे कोकण रेल्वे वेळापत्रकात सुधारणा केली. त्यामुळे 10 जून ऐवजी 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. हा कालावधी 20 ऑक्टोबरपर्यंत होता. त्यानंतर रेल्वेचे नियमित वेळापत्रक लागू होणार आहे.
advertisement
मध्ये रेल्वेकडून सुटणाऱ्या गाड्या
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू जंक्शन (रोज)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्सप्रेस (रोज)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा)
  • दादर टर्मिनस ते सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस (रोज)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (आठवड्यातून 4 दिवस)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव 'वंदे भारत' (आठवड्यातून 6 दिवस)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्सप्रेस (रोज)
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Konkan Railway Schedule: प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता 'कोकण रेल्वे'चा वेग वाढणार, 'या' तारखेपासून वेळापत्रकात होणार बदल
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement