Buldhana Accident: बाइकची बसला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Last Updated:

मिळालेल्या माहितीनुसार थांबलेल्या बसला मोटारसायकल धडकली आणि त्यामुळे दुर्घटना घडली. गोपाळ सुरळकर, धनंजय ठेंग, सुभाष सोनुने अशी मृतांची ओळख पटली आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलडाणा : रस्त्यावर थांबलेल्या बसला बाईकने धडक दिली आहे. ही धडक इतकी भयंकर होती की मोटारसायकलची अवस्था अत्यंत वाईट आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर चिखली रोडवरील वरडा गेट जवळील हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार थांबलेल्या बसला मोटारसायकल धडकली आणि त्यामुळे दुर्घटना घडली. गोपाळ सुरळकर, धनंजय ठेंग, सुभाष सोनुने अशी मृतांची ओळख पटली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. बाईकच नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला का याचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघातामुळे सुरळकर, ठेंग आणि सोनुने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Buldhana Accident: बाइकची बसला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement