Ganesh Chaturthi 2023: श्री गणरायाला ही फळं आहेत विशेष प्रिय

Last Updated:

कोणत्याही शुभ कार्यापूर्वी सर्वप्रथम आवाहन करून श्री गणेशपूजन केलं जातं

News18
News18
मुंबई, 14 सप्टेंबर:  श्री गणपतीचा समावेश भगवान विष्णू, शंकर, सूर्य आणि आदिशक्ती दुर्गादेवीसह पाच प्रमुख देवतांमध्ये होतो. हिंदू धर्मात या सर्व देवतांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. यात श्री गणरायाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी सर्वप्रथम आवाहन करून श्री गणेशपूजन केलं जातं. पुराणांनुसार, श्री गणराया विघ्नहर्ता म्हणजे सर्व संकटं दूर करणारा आणि बु्द्धि देणारा देव आहे. गणरायाची कृपादृष्टी प्राप्त झाली तर ज्ञान, सुख आणि संपन्नता वाढते. प्रत्येक देव-देवतेला विशिष्ट पदार्थ, फुलं किंवा वस्तू प्रिय असतात. भगवान शंकराला बेलपत्र विशेष प्रिय असतं. तसंच श्री गणपतीला मोदकाव्यतिरिक्त अन्य काही वस्तू, फळंदेखील प्रिय आहेत. या वस्तू किंवा फळं गणेशाला अर्पण केली तर जीवनात सुख-समृद्धी लाभते. व्यक्ती ज्ञानसंपन्न, बुद्धिमान होते. पंडित इंद्रमणी घनस्याल आपल्याला अशी पाच फळं आणि वस्तूंविषयी माहिती देत आहेत, जी श्री गणरायाला श्रद्धापूर्वक अर्पण केली, तर त्याची कृपादृष्टी लवकर प्राप्त होते.
श्री गणरायाच्या आवडीची पाच फळं
श्री गणपतीला प्रामुख्याने लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो; पण ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या मते, अशी पाच फळं आहेत जी गणरायाला विशेष प्रिय आहेत. त्यात केळी, पेरू, सीताफळ, बेल आणि जांभळांचा समावेश आहे. श्री गणेशाच्या पूजेवेळी या फळांचा नैवेद्य दाखवून त्यांचं वाटप केलं तर सर्व प्रकारचे रोग, दुःख आणि दोष दूर होतात आणि घरात सुख व समृद्धी नांदते. तसंच जन्मकुंडलीत बुध ग्रह प्रतिकूल असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम नाहीसा होतो.
advertisement
अशा प्रकारे प्रसन्न होतो श्री गणराय
पाच फळांव्यतिरिक्त इतर उपायांद्वारेही गणरायाला प्रसन्न करता येतं. यासाठी तुम्ही श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता. गणपतीला मोदक विशेष प्रिय आहेत. श्री गणेशाच्या पूजेत मोदक अनिवार्य मानले जातात. तसंच साधा, मोतिचुराचा लाडूदेखील गणरायाला विशेष प्रिय आहे. याशिवाय बेसन, नारळ, तीळ किंवा रव्याच्या लाडवांचा नैवेद्यही गणपतीला दाखवतात. श्री गणरायाला दूर्वा विशेष प्रिय आहेत. ओम् गं गणपतये नमः किंवा इतर कोणत्याही पौराणिक मंत्राचा जप करत एक-एक दूर्वा श्री गणपतीला अर्पण केली तर संबंधित व्यक्तीची ज्ञानसंपदा वाढते. तसंच शेंदूर, झेंडूचं फूल, सुपारी, हळकुंड, जानवं या वस्तूदेखील गणरायाला अर्पण करतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Ganesh Chaturthi 2023: श्री गणरायाला ही फळं आहेत विशेष प्रिय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement