पश्चिम महाराष्ट्रात धो-धो बरसणार, पाहा तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज
- Published by:Mohan Najan
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि आजू बाजूच्या परिसरात आकाश ढगाळ राहणार आहे. तर अधून मधून पावसाची शक्यता आहे. पुण्यातील घाट विभागात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज पुण्यात 25 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement

सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 28 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून अधूनमधून मोठ्या सरी येत आहेत. मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात आज 27 अंश सेल्सिअस कमाल तर 20अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement

कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात आज सायंकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. तर काही भागात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये आज 26 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज पाऊस चांगला होईल. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर आज वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूरमध्ये आज 25 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2024 8:09 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पश्चिम महाराष्ट्रात धो-धो बरसणार, पाहा तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज


