Germany Munich Attack: जर्मनीमध्ये सुरक्षा परिषदेपूर्वी मोठा हल्ला, अफगाण तरुणाने गर्दीत गाडी घुसवली; 28 जणांना...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Germany Munich Attack: जर्मनीमधील न्यू ओर्लियस येथे एका युवकाने गर्दीत गाडी घुसवली, या घटनेत 28 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर मानली जाते.
बर्लिन: जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरक्षा परिषदेच्या पूर्वसंध्येला मोठा कार हल्ला झाला. एका अफगाण युवकाने भरधाव कार जमावात घालून 28 लोकांना जखमी केले, यापैकी काहींची स्थिती गंभीर आहे. आरोपी जर्मनीत आश्रयासाठी आला होता.
हा हल्ला म्युनिक येथे गुरुवारी सकाळी 10:30 वाजता झाला. हल्ल्याच्या वेळी युनियनचे आंदोलन सुरू होते आणि मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. अचानक, आरोपी युवकाने वेगाने कार चालवत गर्दीमध्ये घुसवली. यामध्ये लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि आरोपीला अटक केली.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी 24 वर्षीय अफगाण युवक असून तो जर्मनीत शरण मागत होता. मात्र, त्याने हा हल्ला का केला याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ल्यानंतर म्युनिकमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
नवे आयकर विधेयक २०२५: जुन्या आयकर कायद्यापेक्षा वेगळे कसे, काय बदल झाले?
बावेरीया प्रांताचे गव्हर्नर मार्कस सॉडर यांनी या घटनेला ‘हल्ला’ असे संबोधले आहे. तसेच, म्युनिकच्या महापौरांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा म्युनिकमध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद सुरू होणार आहे.जर्मनीतील या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
advertisement
अशाच प्रकारची घटना काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स येथे घडली होती. तेव्हा ट्रकने केलेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Germany Munich Attack: जर्मनीमध्ये सुरक्षा परिषदेपूर्वी मोठा हल्ला, अफगाण तरुणाने गर्दीत गाडी घुसवली; 28 जणांना...


