LIC ने लाँच केले 4 नवे कोरे प्लॅन, वयाच्या 33 व्या वर्षी मिळणार मोठा फायदा

Last Updated:

पॉलिसी टर्मदरम्यान इन्शुअर्ड व्यक्तीचं निधन झाल्यास यातून तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. हे बेनिफिट गॅरंटीड असेल.

News18
News18
देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसी ग्राहकांसाठी बचत आणि सुरक्षितता दोन्हीचा लाभ देणाऱ्या अनेक योजना आणत असते. आता एलआयसीने चार नवीन इन्शुरन्स प्लॅन आणले आहेत. हे सर्व टर्म इन्शुरन्स प्लॅन्स आहेत व सर्वांमध्ये लोन घेण्याची सुविधा मिळते. हे प्लॅन्स देशातील तरुण लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून डिझाईन करण्यात आले आहेत. एलआयसी युवा टर्म, एलआयसी डिजी टर्म, एलआयसी युवा क्रेडिट लाईफ, एलआयसी डिजी क्रेडिट लाईफ अशी या प्लॅनची नावं आहेत. हे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये घेता येतात.
एलआयसी युवा टर्म व एलआयसी डिजी टर्मचे फायदे
हे दोन्ही इन्शुरन्स प्लॅन एकसारखेच आहेत, यात एक ऑफलाइन ग्राहकांसाठी व एक ऑनलाइन ग्राहकांसाठी आहे. हा एक नॉन-लिंक्ड, इंडिव्हिज्युअल, प्युअर रिस्क प्लॅन आहे. पॉलिसी टर्मदरम्यान इन्शुअर्ड व्यक्तीचं निधन झाल्यास यातून तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. हे बेनिफिट गॅरंटीड असेल.
या प्लॅनमध्ये किमान 50 लाख रुपयांचा विमा करता येऊ शकतो. 50 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतचा विमा एक लाख रुपयांच्या पटीत 75 लाख ते 1.5 कोटी रुपयांचा विमा 25 लाखांच्या पटीत, 1.5 कोटी ते चार कोटी रुपयांपर्यंतचा विमा 50 लाख रुपयांच्या पटीत करता येतो. तुम्हाला जर 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा घ्यायचा असेल तर तो एक कोटी रुपयांच्या पटीत असेल.
advertisement
या विम्यामध्ये सिंगल प्रीमिअम पेमेंटचा लाभ घेता येतो. सिंगल प्रीमिअम पेमेंटमध्ये डेथ बेनिफिट 125% मिळेल. इतरवेळी तुम्हाला ॲन्युलाइज्ड प्रीमिअमच्या सातपट किंवा मृत्युवेळी भरलेल्या प्रीमिअमच्या 105% पर्यंत परतावा मिळेल. हा विमा प्लॅन खरेदी करण्यासाठी किमान वय 18 ते कमाल 45 वर्षे मर्यादा आहे, तर मॅच्युरिटीचे वय 33 ते 75 वर्षे आहे.
advertisement
एलआयसी युवा क्रेडिट लाईफ व एलआयसी डिजी क्रेडिट लाईफ प्लॅनचे फायदे
या दोन्ही पॉलिसी सारख्या आहेत, फक्त ऑफलाइन व ऑनलाइन ग्राहकांसाठी त्यांची नावं वेगळी ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही पॉलिसी नॉन-लिंक्ड, इंडिव्हिज्युअल, प्युअर रिस्क व लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स आहेत. यात डेथ बेनिफिट पॉलिसी टर्मबरोबर कमी होत जाते. या पॉलिसीसाठी सम ॲशुअर्ड रक्कम किमान 50 लाख रुपयांपासून सुरू होते. यात वेगवेगळ्या रेंजच्या मल्टिपल अमाउंट वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत, ज्या एलआयसी युवा टर्मप्रमाणेच आहेत.
advertisement
या पॉलिसीसाठी किमान वय 18 ते 45 वर्षे आहे, तर मॅच्युरिटी वय 23 ते 75 वर्षे आहे. महिलांना प्रीमिअम भरण्यासाठी विशेष डिस्काउंट मिळतं. ही पॉलिसी तुमच्या हाऊसिंग, व्हीकल लोनच्या लायबिलिटीवर टर्म इन्शुरन्स प्लॅन कव्हर देते. त्यामुळे मृत्यू झाल्यास तुमच्यावर लोन बाकी असेल तर ते पॉलिसीतून फेडलं जातं. यामध्ये तुम्ही पॉलिसीच्या बदल्यात लोन घेताना तुमच्या आवडीचे व्याज दर निवडू शकता. लोनचे व्याज दर वेळेनुसार कमी होत जातात. जर तुम्ही पूर्ण पॉलिसी टर्म कम्प्लिट केली तर तुम्हाला काहीच पैसे मिळत नाहीत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
LIC ने लाँच केले 4 नवे कोरे प्लॅन, वयाच्या 33 व्या वर्षी मिळणार मोठा फायदा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement