Viral Video : दोस्त असावा तर असा! मध्यरात्री मुलीकडे तो आला, पण कुत्र्याने शिकवला धडा, नेमकं झालं काय?
Last Updated:
Viral Video : एका भटक्या कुत्र्याने रस्त्यावर झोपलेल्या एका मुलीचं रक्षण करून माणुसकीचं खरं उदाहरण दाखवलं.नेमके काय घडलं ते एकदा व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा.
सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्या मालकावर असलेले त्याचे प्रेम आणि काळजी पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून मुक्या प्राण्यांचीही माया किती निरागस आणि खरी असते हे पुन्हा एकदा सर्वांना जाणवले आहे.
व्हायरल व्हिडिओत नेमके घडले तरी काय?
व्हिडिओत रात्रीची वेळ दिसत असून एक मुलगी रस्त्याच्या कडेला झोपलेली आहे. व्हिडिओत पुढे पाहू शकता तिच्या अंगावर फाटकी चादर, चेहऱ्यावरुन पूर्णपणे ती थकलेली दिसत असून संपूर्ण परिसरात पसरलेला अंधारा दिसत आहे. त्याच रस्त्यावरुन अनेक लोक गेली मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं, वाहनं वेगाने पुढे गेली पण त्या क्षणी एक कुत्रा तिच्या जवळ आला आणि त्याने जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले.
advertisement
तो कुत्रा हळूच त्या मुलीच्या शेजारी बसला. सुरुवातीला लोकांना वाटलं, तो काही खाण्याच्या शोधात आला असेल. पण नाही त्याने तिच्या अंगावर आपलं शरीर टेकवून तिला थंडीपासून वाचवलं. वाहनं जात असताना तो जागाच राहिला, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता. जणू तो असं वाटत होतं, ही मुलगी आता माझ्या जबाबदारीवर आहे.
रात्र सरत गेली, पण तो कुत्रा त्या जागेवरुन हलला नाही. तो पहारा देतच राहिला. काही वेळाने एक व्यक्ती त्या मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो मात्र त्या कुत्र्याने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला.अर्थात त्या व्यक्तीपासून तिला वाचवले. लोकांनी त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काही तासांतच ही घटना देशभर व्हायरल झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Viral Video : दोस्त असावा तर असा! मध्यरात्री मुलीकडे तो आला, पण कुत्र्याने शिकवला धडा, नेमकं झालं काय?


