advertisement

पंतप्रधान 22 फेब्रुवारी रोजी मेरठच्या दौ-यावर जाणार

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठमध्ये 12930 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, दिल्ली-मेरठ नमो भारत कॉरिडॉर आणि मेरठ मेट्रोचे लोकार्पण करणार आहेत.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 च्या सुमाराला शताब्दी नगर नमो भारत स्थानकावरून मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान दुपारी 1 च्या सुमाराला मेरठमध्ये सुमारे 12,930 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
पंतप्रधान 82 किमी लांबीच्या संपूर्ण दिल्ली-मेरठ नमो भारत कॉरिडॉर चे लोकार्पण करतील. ते भारताच्या पहिल्या नमो भारत रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (आरआरटीएस) च्या उर्वरित विभागांचे उद्घाटन करतील. यामध्ये दिल्लीतील सराय काले खान आणि न्यू अशोक नगर दरम्यानच्या 5 किमी आणि उत्तर प्रदेशातील मेरठ दक्षिण ते मोदीपुरम दरम्यानच्या 21 किमी मार्गाचा समावेश आहे.
advertisement
ताशी 180 किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेली नमो भारत ही भारतातील पहिली प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली आहे. ती साहिबाबाद, गाझियाबाद, मोदीनगर आणि मेरठ यासारख्या प्रमुख शहरी केंद्रांना दिल्लीशी जलद गतीने जोडेल.
कॉरिडॉरचे मूळ स्थानक सराई काले खान, हे या उद्घाटनानंतर सुरू होणाऱ्या चार नमो भारत स्थानकांपैकी एक आहे. एक प्रमुख मल्टी-मोडल हब म्हणून हे स्थानक धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी असून, ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक, दिल्ली मेट्रोची पिंक लाइन, वीर हकीकत राय आयएसबीटी आणि रिंग रोड यांना अखंडपणे जोडते. शताब्दी नगर, बेगमपुल आणि मोदीपुरम ही आणखी तीन नमो भारत स्थानके मेरठमध्ये आहेत.
advertisement
पंतप्रधान मेरठ साउथ आणि मोदीपुरम दरम्यानच्या मेरठ मेट्रो सेवांचे उद्घाटन देखील करतील, त्या नमो भारत सारख्याच पायाभूत सुविधांवर चालतील, अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. मेरठ मेट्रो ही भारतातील सर्वात वेगवान मेट्रो प्रणाली असेल, आणि त्याचा कमाल परिचालन वेग सुमारे 120 किमी प्रतितास असेल. ही मेट्रो आपल्या सर्व नियोजित थांब्यांसह, संपूर्ण मार्ग केवळ 30 मिनिटांत पार करेल. नमो भारत आणि मेरठ मेट्रोचे एकाच पायाभूत सुविधांवर केलेले हे अखंड एकत्रीकरण हाय-स्पीड इंटरसिटी प्रवास आणि जलद शहरांतर्गत हालचाल सुनिश्चित करेल, आणि भारतातील एकात्मिक शहरी आणि प्रादेशिक वाहतुकीसाठी एक बेंचमार्क (मापदंड) स्थापित करेल. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि परिणामी वाहनांमधून होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होईल.
advertisement
हे प्रकल्प पंतप्रधानांच्या शहरी गतिशीलतेत परिवर्तन घडवून आणण्याच्या आणि नागरिकांचे जीवनमान सुलभ करणाऱ्या अखंड, कार्यक्षम, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनाला आणखी गती देतील.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पंतप्रधान 22 फेब्रुवारी रोजी मेरठच्या दौ-यावर जाणार
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement