advertisement

साहेबांनी दादांसमोर हात जोडले अन् सुनेत्रा पवार हुंदक्यांनी दाटल्या, इमोशनल करणारा Video

Last Updated:

सहयोग सोसायटीतील निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार घातलेला भलामोठा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी पुष्प वाहून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

शरद पवार यांनी दादांसमोर हात जोडले अन् सुनेत्रा पवार हुंदक्यांनी दाटल्या
शरद पवार यांनी दादांसमोर हात जोडले अन् सुनेत्रा पवार हुंदक्यांनी दाटल्या
बारामती (पुणे): ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती येथील सहयोग निवासस्थानी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी पवार कुटुंबातील सगळ्याच सदस्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. पवार कुटुंबातला हा हळवा क्षण अनेकांना भावुक करून गेला.
गत संपूर्ण सप्ताहात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा असताना आणि दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी सायंकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरिता पोहोचले आहेत. बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसेच राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
advertisement

साहेबांनी अजितदादांचं दर्शन घेतलं अन् सुनेत्रा पवारांसह सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या

सहयोग सोसायटीतील निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार घातलेला भलामोठा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी पुष्प वाहून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. ज्यावेळी अजित पवार यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांनी हात जोडले त्यावेळी पवार कुटुंबातले सगळेच भावुक झाले. सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. अजित पवार यांच्या भगिनी देखील हुंदक्यांनी दाटल्या. पवार कुटुंबातल्या जावा देखील भावनिक झाल्या होत्या. पवार कुटुंबातल्या या हळव्या क्षणांनी उपस्थित सगळेच भावुक झाले.
advertisement
पार्थ पवार यांनी बुधवारी सकाळी शरद पवार यांची गोविंदबागेत जाऊन भेट घेतली. या भेटीत जवळपास तासभर चर्चा झाली. विलिनीकरणासंदर्भात दोन्ही पक्षांत वेगवेगळे दावे सुरू असताना पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. याच भेटीत संध्याकाळी सहयोगला येतो, असा निरोप शरद पवार यांनी दिला. त्यानुसार शरद पवार हे त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सहयोग निवासस्थानी दाखल झाले.
advertisement

सहयोगला कोण कोण उपस्थित?

शरद पवार, प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, रणजीत पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार तसेच अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील रजनी इंदुलकर, नीता पाटील आदी उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
साहेबांनी दादांसमोर हात जोडले अन् सुनेत्रा पवार हुंदक्यांनी दाटल्या, इमोशनल करणारा Video
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement