'लग्नाची बोलणी करायची आहे घरी ये'; गर्लफ्रेंडच्या घरच्यांच्या मेसेज ठरला जीवघेणा, विद्यार्थ्याची क्रिकेट बॅटने ठेचून हत्या

Last Updated:

Shocking Murder: तेलंगणातील संगारेड्डीत गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने 19 वर्षीय इंजिनिअरिंग स्टुडेंटची क्रिकेट बॅटने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रेग्नन्सीवरून सुरू झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. पोलिस तपासात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

News18
News18
संगारेड्डी: तेलंगणातील संगारेड्डी जिल्यात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याची त्याच्या गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांनी क्रिकेट बॅटने मारहाण करून हत्या केली. मृत युवकाचे नाव ज्योति श्रीवन साई (19) असे आहे. मंगळवारी त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता, तर बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार अमीनपूर येथील रहिवासी श्रीजा (19) आणि श्रीवन गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दहावीपासूनच त्यांची ओळख होती आणि दोघांच्या घरच्यांनाही त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती. मात्र श्रीजाच्या घरच्यांनी या नात्याला सुरुवातीपासून विरोध केला होता. अलीकडेच कुटुंबाला समजले की श्रीजा तीन महिन्यांची गर्भवती आहे. त्यानंतर घरच्यांचा राग अधिक वाढला.
advertisement
मंगळवारी श्रीजाच्या आई-वडिलांनी ‘लग्नाबद्दल बोलायचे आहे’ असा बहाणा करून श्रीवनला घरी बोलावले. आरोपानुसार तो घरात पोहोचताच श्रीजाची आई आणि कुटुंबातील इतरांनी त्याच्यावर अचानक क्रिकेट बॅटने हल्ला केला. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच पाय आणि बरगड्या तुटल्या. त्याला तातडीने कुकटपल्लीतील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवन मेसम्मागुडा येथील सेंट पीटर्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचा सेकंड इयरचा विद्यार्थी होता. तो कुतबुल्लापूर येथे भाड्याच्या घरात राहत होता. तर श्रीजा BCAच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
advertisement
तपासात उघड झाले की मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास श्रीवन श्रीजाच्या घरी पोहोचला. तेव्हा गर्भधारणेबाबत श्रीजा आणि तिची आई सीरी यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की संतापलेल्या सीरीने क्रिकेट बॅट उचलली आणि श्रीजाश्रीवन दोघांवरही प्रहार केले. श्रीजाला वाचवण्याचा प्रयत्न करताना श्रीवनच्या डोक्याला, पाठीला आणि खांद्याला दुखापत झाली. श्रीजाचा उजवा हात फ्रॅक्चर झाला.
advertisement
मारहाण झाल्यानंतर श्रीवन घरी परतला. त्याचवेळी श्रीजा आणि तिची आई गर्भधारणेची तपासणी करून सुमारे रात्री 11.30 वाजता घरी परतल्या. पोलिसांच्या मते बुधवार पहाटे 3.30 वाजता श्रीवनला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. नंतर एका दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सकाळी 6.30 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'लग्नाची बोलणी करायची आहे घरी ये'; गर्लफ्रेंडच्या घरच्यांच्या मेसेज ठरला जीवघेणा, विद्यार्थ्याची क्रिकेट बॅटने ठेचून हत्या
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement