हुबळी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडीलाही थांबणार, किती वाजता ट्रेन स्थानकावर येणार?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
पुणे रेल्वे स्थानकातून हुवळीला रवाना होणारी वंदे भारत एक्सप्रेस सेवेला 24 नोव्हेंबर, रोजी पासून संध्याकाळी 5 वाजन 43 मिनिटाने किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल.
सांगली: प्रवाशांकडून वंदे भारत एक्सप्रेसला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि पुणे- हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सेवेला दौंड आणि किर्लोंस्करवाडी या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाद्वारे घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सोलापूर प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला तसेच पुणे रल्वे स्थानकातूनू हुबळीला प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या अगोदर काही ठराविक रल्वे स्थानकावरच थांबा देण्यात यायचे परंतु रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांना सहज आणि सुलभपणे दौंड आणि किलोस्करवाडीकडे प्रवास करता येईल.
अशी राहिल किर्लोस्करवाडीत थांबण्याची वेळ
पुणे रेल्वे स्थानकातून हुबळीला रवाना होणारी वंदे भारत एक्सप्रेस सेवेला 24 नोव्हेंबर, रोजी पासून संध्याकाळी 5 वाजन 43 मिनिटाने किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे हुबळीहून पुणे रेल्वे स्थानकाकडे प्रस्थान करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस सेवेला किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक येथे सकाळी 9 वाजून 38 मिनिटांपर्यंत थांबा देण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसला दौंड, किर्लोस्करवाडीसह इतर रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून उपस्थित होत होती. मध्य रेल्वेप्रशासनाने दौंड आणि किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकांवर थांवा देण्याचे निर्णय घेतल्याने प्रवाशांना चांगलीच मदत होईल असे रेल्वे अभ्यासक सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
हुबळी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडीलाही थांबणार, किती वाजता ट्रेन स्थानकावर येणार?


