माजी सैनिकानं केली द्राक्षांची शेती, विक्रमी दर, पण हातात काय? सगळा हिशोबच मांडला!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Grapes Farming: अतिवृष्टी आणि वटवाघळांचा हल्ला अशा संकटातून सांगलीच्या माजी सैनिकाने द्राक्षांची बाग वाचवलीये. आता त्यांना विक्रमी 551 रुपयांचा दर मिळाला आहे.
अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानात द्राक्षांचं बाग टिकवणं हे जणून आव्हानच असतं. पण सीमेवर अनेक आव्हांनाचा सामना करणाऱ्या सांगलीच्या निवृत्त जवानानं हे आव्हान लिलया पेललंय. पलुस तालुक्यातील नागठाणे येथे माजी सैनिक धनाजी पाटील यांची द्राक्ष बाग आहे. यंदा त्यांच्या द्राक्षांना विक्रमी 551 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे.
advertisement
माजी सैनिक धनाजी पाटील यांची नागठाणे येथे 12 एकर शेती आहे. यापैकी 62 गुंठे शेतामध्ये त्यांनी द्राक्षबाग पिकवली आहे. 2014 पासून ते कृष्णा द्राक्ष व्हरायटीचे उत्पादन घेतात. अतिवृष्टीच्या काळात देखील त्यांनी उभ्या पावसामध्ये 9 सप्टेंबर 2024 रोजी बागेची पीक छाटणी घेतली. पीक छाटणी पासून डंपिंगपर्यंत पूर्ण काळ पावसाचा सामना केला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आता द्राक्षांना प्रति 4 किलोला विक्रमी 551 रुपयांचा दर मिळाला. पाटील यांच्या मते एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी 100 रुपये उत्पादन खर्च आला आणि 4 किलो द्राक्षासाठी 551 रुपये दर मिळाला. मिळालेल्या दरातून उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्याचा कष्टाप्रमाणे समाधानकारक नफा मिळत नाही, अशी खंत पाटील व्यक्त करातत. (प्रिती निकम, प्रतिनिधी)


