मित्राचा सल्ला ऐकला अन् उसाचा नाद सोडला, अर्ध्या एकरात शेतकरी लखपती!

Last Updated:
Agriculture News: सोलापूरच्या शेतकऱ्याने मित्राचा सल्ला ऐकून ऊस शेतीला फाटा दिलाय. आता दुहेरी पिकांतून अर्धा एकरात लाखांचे उत्पन्न घेतलेय.
1/7
सध्या शेतकरी प्रयोगशील शेती करत शेतात वेगवेगळे पिके आणि पालेभाज्या घेत आहेत. अशीच एक वेगळी शेती सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावातील एका अंगठाबहाद्दर शेतकऱ्याने केली आहे.

advertisement
2/7
अर्ध्या एकरामध्ये त्यांनी घेवडा आणि मुळाची लागवड केली आहे. मुळा विक्रीतून 25 दिवसात त्यांना आतापर्यंत 40 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. तर घेवडा विक्रीतून 10 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. सध्या मुळा आणि घेवड्याची तोडणी सुरू असून त्यांना यामधून लाखोंचे उत्पन्न मिळणार आहे.

3/7
हराळवाडी गावातील अंगठाबहाद्दर शेतकरी रंगसिद्ध शेळके यांनी अर्ध्या एकरात मुळा आणि घेवड्याची लागवड केली आहे. कमी दिवसात जास्त उत्पन्न कसं घेता येतं या पद्धतीने रंगसिद्ध शेळके यांनी शेती केली आहे. या आधी रंगसिद्ध शेळके हे उसाची शेती करत होते. उसाचे बील लवकर मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती हालाखीची होत चाललेली होती.

4/7
रंगसिद्ध शेळके यांच्या मित्राने मुळा आणि घेवडा लावायचा सल्ला दिला. मित्राने दिलेला सल्ला ऐकून रंगसिद्ध शेळके यांनी एकरात मुळा आणि घेवडा याची लागवड केली. अर्ध्या एकरात मुळा आणि घेवडा लागवडीसाठी त्यांन 30 हजार रुपयांचा खर्च आला.

5/7
फक्त मुळा विक्रीतून शेतकरी रंगसिद्ध शेळके यांना आतापर्यंत 40 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. सध्या शेतात मुळा तोडणी सुरू असून मुळा विक्रीतून शेतकरी रंगसिद्ध शेळके यांना 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.

6/7
शेतात घेवडा सुद्धा चांगला आला असून त्याच्या विक्रीतूनही 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न शेतकरी शेळके यांना मिळणार आहे. अर्ध्या एकरात रंगसिद्ध यांना एक ते दीड लाखांचे उत्पन्न या शेतीतून मिळणार आहे.

7/7
रंगसिद्ध शेळके हे शेतातील मुळा स्वतः तोडून बाजारात 10 रुपयांना एक नग याप्रमाणे विक्री करत आहे. शेतकऱ्यांनी जर डोकं लावून शेती केली तर नोकरापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकाल, असा सल्ला अंगठाबहाद्दर शेतकरी रंगसिद्ध शेळके यांनी दिला आहे. (इरफान पटेल, प्रतिनिधी)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement