तण काढणीचं टेन्शन होणार गायब, शेतकरी पुत्रानं बनवलं अनोखे जुगाड, खर्चातही बचत

Last Updated:
इंजिनिअर राहुल माळी यांनी एक जुगाड बनवलं आणि शेतकऱ्याचं तण काढणीचं टेन्शन कायमचं गायब केलंय. आता त्यांनी बनवलेल्या ग्रास कटरचा दुहेरी फायदा होतोय.
1/7
 द्राक्ष बागेमध्ये सतत येणारे गवत, तण काढणीचा मजुरी खर्च अधिक असतो आणि त्यासाठी वेळेत मजूर देखील मिळत नाहीत. याच बाबीला सांगलीतील शेतकरी तुकाराम माळी वैतागले आणि त्यांनी ही व्यथा आपल्या इंजिनिअर मुलाला सांगितली. यावर इंजिनिअर राहुल माळी यांनी एक जुगाड बनवलं आणि शेतकऱ्याचं तण काढणीचं टेन्शन कायमचं गायब केलंय. आता त्यांनी बनवलेल्या ग्रास कटरचा दुहेरी फायदा होतोय. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊया.

advertisement
2/7
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावचे प्रगतशील शेतकरी तुकाराम माळी यांची 25 एकर द्राक्ष बाग आहे. द्राक्षेबागेत सतत येणारे तण, गवत काढण्यासाठी लागणारी मजुरी परवडत नसल्यामुळे त्यांनी मार्केटमधून हाताने धरून चालणारे गवत काढणी यंत्र खरेदी केले होते. मात्र हे यंत्र मजुराच्या सहाय्याने वापरता येत होते. यंत्र चालवणाऱ्या मजुराच्या मजुरीला वैतागून त्यांनी आपल्या इंजिनीयर मुलाला भांगलनीची समस्या सांगितली. काही जुगाड करता येते का? याचा पिता-पुत्रांनी विचार करत ट्रॅक्टरवर चालणारे ग्रास कटर तयार केले.

3/7
शेतकरी पुत्र राहुल माळी हे एम.टेक इंजिनियर आहेत. मात्र ते वडिलांसोबत 25 एकर शेतीचे व्यवस्थापन पाहतात. द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष हंगामानंतर दोन महिने मिळणाऱ्या विश्रांतीच्या काळात माळी पिता-पुत्र प्रत्येक वर्षी काही ना काही जुगाड करतात. याच जुगाडाच्या छंदातून त्यांनी 3 वर्ष ग्रास कटर मशीन वरती काम करून शेतातील तण काढणीचे टेन्शन कायमचे गायब केले आहे.

4/7
इंजिनिअर राहुल माळी सांगतात की, शेतातील तण काढण्यासाठी मजुरांना मोठा खर्च करावा लागतो. मार्केटमध्ये उपलब्ध असणारी तण काढण्याची यंत्रे पाहिली. परंतु मजुराच्या सहाय्याने वापरता येणारे यंत्र एक एकर क्षेत्र भांगलनीसाठी दोन दिवसांचा कालावधी घेते. त्यातही यंत्र चालवणाऱ्या मजुराचा खर्च पेट्रोलचा खर्च यासह अधिक वेळ द्यावा लागतो. याशिवाय तणनाशकाच्या सततच्याा फवारणीने शेताचे मोठे नुकसान होते. आम्ही केलेली जुगाड मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

5/7
सुरुवातीला एक कटर वापरून मशीन बनवण्याचा प्रयत्न केला. जुन्या ब्लॉअरचा पुनर्वापर करून एक कटर फिरवून पाहिले. हा जुगाड यशस्वी झाल्यानंतर ट्रॅक्टरची अधिक पावर वापरावी म्हणून एकाच वेळी चार ते पाच कटर कसे वापरता येतील याचा अभ्यास केला. सलग तीन वर्षे सातत्याने जुगाडामध्ये अभ्यासपूर्ण सुधारणा करत शेवटी ग्रास कटर मशीन यशस्वीपणे तयार केले, असेही माळी यांनी सांगितले.

6/7
एक ग्रास कटर बनवण्यासाठी 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो. मात्र 2 ते 3 तासात एक एकर क्षेत्रातील गवत कापणी होते. एका वेळी 8 फुटाचे तण काढणे शक्य होते. तण कापण्यासाठी लागणारा खर्च देखील कमी होतो. जुगाड 5 माणसांचे काम एकाच वेळी करते. शेतकरी या मशीनचा वापर द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्री, पेरू यांसारखा बागांमध्ये करू शकतात. मोठे क्षेत्र असणाऱ्या बागायतदारांना एकदा या जुगाडा मध्ये गुंतवणूक केली की भांगलनीच्या खर्चापासून सुटका मिळते.

7/7
शेतकरी इंजिनियर पुत्राने तयार केलेले ग्रास कटर जुगाडाला बागायतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. हे जुगाड लोकांचा खात्रीत उतरले असून आजवर जवळपास 70 मशीन विकल्या आहेत. मशीन खरेदी केलेले सर्व बागायतदार भांगलन खर्चात बचत झाल्याबद्दल समाधानी आहेत. एक ग्रास कटर तयार करण्यासाठी माळी पिता-पुत्रांना 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो. शेतकरी मित्रांच्या मागणीनुसार ते ग्रास कटर बनवून देतात. वडिलांच्या सल्ल्याने इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा आधार देत शेतकरी पुत्राने बनवलेल्या ग्रास कटर जुगाडाचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे. शेतातील भांगलनीचा खर्च, वेळ आणि व्यापामध्ये बचत करणारे ग्रास कटर जुगाड मातीच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयोगी ठरत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement